एक्स्प्लोर

मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो, असं समजू नका, भुजबळांचा दावा; मनोज जरांगे म्हणतात, थोडं थांबा कळेल!

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या वादामुळे आम्ही पडलो, असे समजू नका, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यावरून मनोज जरांगेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठी मुसंडी मारली. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महायुतीला राज्यात यश आले नाही, अशी चर्चा सध्या रंगली आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या वादामुळे आम्ही पडलो, असे समजू नका. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता. तिथेही आपले उमेदवार पडले आहेत, असा दावा केला. मात्र या  दाव्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात भाषण करताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, आपण मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलेले आहे. हे आरक्षण टिकणारे आहे. पण असे असतानाही काही मागण्या जर होत असतील तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे. असे समजायचे काही कारण नाही की हा जो वाद आहे त्यांच्यामुळे आम्ही पडलो. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता. तिथेही आपले उमेदवार पडले आहेत. हिंदुस्तानात तो वाद नव्हता. 

महाराष्ट्रात संपूर्ण समाज आजही एकत्र - छगन भुजबळ 

काही लोक सांगतात की या वादामुळे उमेदवार पडले. पण दोन-तीन मतदारसंघात हा वाद अजूनही धुसपुसत आहे.  परंतु महाराष्ट्रातील एकंदरीत चित्र पाहिले तर काही ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टी घडतात. परंतु संपूर्ण समाज हा आजही एकत्र आहे. मराठा, आदिवासी, दलित समाज अजूनही एकत्र आहे. त्या सर्वांना आपण सोबत घेऊन जाऊयात. काही लोकांना वाटत होते की, मला बोलावले की त्यांना मते कमी पडतील. मी न जाऊन पण काही फायदा झाला नाही. कोणाला वाटायचे याचा बनार वर फोटो छापला की आपली मते जातील. पण ठीक आहे आता आपल्याला सगळ्यांना काम करायचे आहे. 

थोडं थांबा कळेल, मनोज जरांगेंचा इशारा 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती आता खालावत आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगेंना मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते टिकणारे आहे.  पण असे असतानाही काही मागण्या जर होत असतील तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे, असे भुजबळांनी म्हटले. यावर जरांगे यांनी तू नको सांगू मला, माझं मला कळतं, असे म्हटले. तर मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो, असं समजू नका, या भुजबळांनी केलेल्या दाव्यावर मनोज जरांगे यांनी थोडं थांबा कळेल तुम्हाला, असा इशाराच दिला आहे.  

आणखी वाचा

Sharad Pawar : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषण मागे घेण्यासाठी थेट शरद पवारांची एन्ट्री?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget