सरकार स्थापन झाल्यावर हाबाडा; तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मनोज जरांगेंनी सांगितली पुढची रणनीती
सगळ्याच आमदारांना मराठ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळं सगळ्यानांच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मांडावा लागेल असे मत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं.
Manoj Jarange Patil : सगळ्याच आमदारांना मराठ्यांनी निवडून दिलं आहे. ओबीसींच्या (OBC) आमदारांना देखील मराठ्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळं सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मांडावा लागेल असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. नसेल तर आमदारांना पुन्हा त्या मतदारसंघात जायचं आहे, त्यामुळं त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढचं सामुहिक उपोषण होणार आहे. ते उपोषण अंतरवाली सराटीत होईल किंवा मुंबईतही होऊ शकतं असे जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच
राजकारण हे आमचं क्षेत्र नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यामध्ये मला पडायचं नाही असे जरांगे म्हणाले. सरकार स्थापन झाल्यानंतर सामुहिक उपोषमाला बसणार आहे. हे उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईतही होऊ शकतं असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, तुळजा भवानीच्या चरणी मागणं
माझ्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे आशिर्वाद मिळू दे हेच मागणं तुळजाभवानी मातेकडे मागितल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण आमचं क्षेत्र नाही. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मात्र, घेणारच असल्याचे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी केली देवदर्शन दौऱ्याला सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांनी आज देवदर्शन दौऱ्याला सुरुवात केली. सकाळी ते 9 वाजता अंतरवाली सराटीतून निघालेल्या मनोज जरांगे यांनी तुळजापुरात कुलस्वामिनी तुळजा भवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, तुळजा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील हे लगेच पंढरपूर इथं विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा