मराठे मुंबईत घुसले अन् जामही केले; मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून मुंबईच्या आझाद मौदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून मुंबईच्या आझाद मौदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आतामुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावे असं जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला एकेक दिवस मुदवाढ देण्यापेक्षा कायमस्वरुपी दिली तरीही हे उपोषण निर्णय होईपर्यंत सुरु राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे दहा मुद्दे.
निर्णय होईपर्यंत उपोषण सुरु राहणार
आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. हे उपोषण आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सुरु राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारच्या हातात आहे की, आंदोलन मोडायचे की मला गोळ्या घालायच्या असेही जरांगे पाटील म्हणाले.
सरकार आडमुठ्यात घुसले की मराठेही आडमुठ्यात घुसतील
आम्ही सरकारला सहकार्य करत आहोत, सरकारनेही आम्हाला सहकार्य करावं असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. पण जर सरकार आडमुठ्यात घुसले तर मराठेही आडमुठ्यात घुसतील असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठे घुसले पण जम केले पण असे जरांगे म्हणाले. जाम केलेली मुंबई मोकळी करण्याची मी आंदोलकांना विनंती केली होती. त्यानंतर आम्ही सगळी वाहने काढल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला त्रास दिला तर बदला होणार
मराठा आंदोलकांना जर मुंबईत त्रास दिला तर आम्ही देखील तुम्हाला त्रास देणार. तुम्ही मुंबईत आम्हाला अशी वागणूक दिली तर तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या सभेतसुद्धा असेल होईल असा इशारा जरांगे यांनी दिला. आम्हाला त्रास दिला तर बदला होणार असे जरांगे म्हणाले. आम्ही मुंबईत आलो म्हणून हॉटेल बंद ठेवले आहेत. जनमताला तुम्हाला किंमत द्यावी लागेल असे जरांगे म्हणाले.
मी बलिदान देण्यासाठी तयार
मी मराठा समाजासाठी बलिदान देण्यासाठी तयार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. माझे बलिदान गेल्यानंतर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. पण तुम्ही त्यांना इथं त्रास देऊ नका असे जरांगे म्हणाले.
शांतता आणि संयम पाळा
मी सर्वांना विनंती करतो की, सर्वांनी शांतता आणि संयम पाळा. कोणतही चुकीचं पाऊल उचलू नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना केलं. रस्तायवर जर कोणी गाड्या लावल्या असतील तर त्या गाड्या काढा, दिलेल्या जागेतच पार्किंग करा असे आवाहन जरांगे यांनी केले.
तुम्ही वेळ लावला तर आणखी मराठी मुंबईत येणार
सरकारने जर मराठा आरक्षण देण्यास वेळ लावला तर आणखी मराठे मुंबईत दाखल होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. काम सोडून लोक मुंबईत दाखल होती असे जरांगे पाटील म्हणाले. आज आंदोलनाचा पहिला टप्पा पडला आहे. असे सात आठ टप्पे असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची इच्छा पूर्ण होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, कारण त्यांना मुंबईत कानाकोपऱ्यात मराठे दिसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुम्हाला जे अपेक्षीत आहे ते होणार आहे. पण आम्ही आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
जेलमध्ये टाका, गोळ्या घाला, तरीही उपोषण करणारच
तुम्ही जर मला जेलमध्ये टाकलं तरीही मी उपोषण करणारच असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नसल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी झेलणार असल्याचे जरांगे म्हणाले.
सरकारनं आमच्याकडे चर्चेसाठी यावं, आम्ही जाणार नाही
सरकारकडे आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सरकारनं आमच्याकडे यावं असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. सरकारला मराठ्यांचं वाटोल खरायचं असल्याचे जरांगे म्हणाले. दीडशे वर्षांच्या आमच्या नोंदी सापडल्या असल्याचे जरांगे म्हणाले.
ओबीसींचे आरक्षण काढून आम्हाला द्या असे म्हणणार नाही
ओबीसींचे आरक्षण काढून आम्हाला द्या असे म्हणणार नाही असे जरांगे म्हणाले. ओबीसींना 32 टक्के आरक्षण आहे. त्यामध्ये आमच्या नोंदी आहेत असे मनोज जरांगे म्हणाले. आमच्या सरकारी नोंदी आहे. आम्ही कोणाचेही घेत नाहीत. हे सर्व गरिब ओबीसींना कळाले आहे. सरकार म्हणत आहे की, एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही, पण आमचटे हक्काचे आरक्षण त्यामध्ये असल्याचे जरांगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























