एक्स्प्लोर

मनोज जरांगे यांची सरकारला डेडलाईन, उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...

Antarwali Sarati : सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहे. मनोज जरांगे यांच्या (Manoj Jarange Patil ) मागण्याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतेय. 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे  (Manoj Jarange Patil )  यांनी राज्य सरकारला (maharashtra government) डेडलाईन दिली आहे. ते म्हणाले की,  "मी सकारात्मक आहे, जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल." दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. 

मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत, मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे, पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे. 

अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का? 

चर्चा करण्यासाठी कोण येणार मला माहित नाही? काल येणार होते पण आले नाहीत. ते अजून आलेच नाही  ते आल्यानंतच चर्चा होईल. केव्हा येईल काय येईल मला माहित नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी. अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का? असा सवालही यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला. 

ओबीसी नेत्यांना नोटीस - 

अंगरवालीत उपोषण करता येणार नाही, त्यामुळे ओबीसी नेत्यांना गोंदी पोलिसांची नोटीस दिली. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही 

सहा दिवसांपासून उपोषण - 

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी (OBC Resrvation) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

मनोज जरांगेंच्या भेटीला खासदार-आमदारांची रांग -

शिससेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसच्या खासदारांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर खासदारांनी राज्यपालांना पत्र लिहून आपण दखल घ्यावी, राज्य सरकार मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत उदासीन असल्याचं म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकार याबाबत सक्रीय झालेय. बजरंग सोनवणे, राजेंद्र राऊत, ओमराजे निंबाळकर, राजेश टोपे, कल्याण काळे, यांच्यासह अनेक खासदार-आमदारांनी त्यांची भेट घेतली.

आणखी वाचा :

मनोज जरांगेंनी निर्वाणीचा इशारा देताच राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले; शंभुराज देसाई अंतरवाली सराटीत जाणार

लक्ष्मण हाके प्राणांतिक उपोषणावर ठाम, पोलिसांच्या नोटीशीनंतरही सराटीकडे रवाना!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget