Manoj Jarange: मनोज जरांगेंची शुगर डाऊन, उपोषणस्थळी डॉक्टरांच्या पथकाने केली तपासणी, तब्येत खालावली
Manoj Jarange Health Update: मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, आंतरवली सराटीमध्ये वैद्यकीय पथकाने तपासणी केली असून जरांगेंच्या तब्येतीबाबत माहिती दिलीये.
Manoj Jarange: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे( Manoj Jarange) यांच्या तब्येतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची आज काहीशी प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केलीये. यावेळी रक्तदाब आणि शुगर तपासणी या पथकाने केली ,त्यांची शुगर लेवल डाऊन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून डीहायड्रेशनमुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती हळू हळू खालावत असून सध्या उपोषणस्थळी वैद्यकीय पथक आले असून जरांगे यांची या पथकाकडून आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, कालपासून आंतरवली सराटीमध्ये कालपासून वैद्यकीय पथक दाखल झाले असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
शुगर लो, डिहायड्रेशनमुळे तब्येत खालावली
मराठा आरक्षणासह सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर जरांगे यांची शुगर लेव्हल ६८ आणि रक्तदाब १०८-७४ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
राज्यात मराठा आरक्षण विषय तीव्र स्वरुप घेत असून जालन्यातील आंतरवली सराटी गावातून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये शाब्दिक चकमकी होत असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेसह सरकारवर निशाणा साधला जात असताना सरकारकडूनही जरांगेंच्या आंदोलनावर प्रत्यूत्तर दिले जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम
मराठा समाजाच्या वतीने आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून सरकारला मराठा आरक्षणासह सगेसोयऱ्यांची मागणी घेऊन ७ ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचीही हाक त्यांनी दिली आहे. दरम्यान, आज आंदोलनाचा चौथा दिवस असून मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यात जरांगे यांची प्रकृती हळू हळू खालावत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे ठाम असून त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र आरक्षणाची डेडलाईन संपल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे, आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
हेही वाचा: