एक्स्प्लोर

'मी देखील आता सर्व उघड करतो', SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange SIT Inquiry : मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

Manoj Jarange SIT Inquiry : मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात देखील गाजताना पाहायला मिळत असून, आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मी मराठ्यांचे काम करतोय.  ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले  तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे म्हणाले आहेत. 

मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही : फडणवीस 

दरम्यान एसआयटी चौकशीबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, “ मला बोलायचं नव्हतं. मराठा सामाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टीकवलं. सारथीला निधी दिला, शिष्यवृत्ती दिली. कर्ज दिले आहे. मराठा सामाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले आणि त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभे राहिले आहे. मराठा समजा जरांगे यांच्या पाठीशी उभं राहिले नसल्याचे फडणवीस म्हणाले.

विधानपरिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक...

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे पडसाद विधानसभाप्रमाणे विधानपरिषदेत देखील उमटले. याच मुद्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे.  हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटीमार्फत चौकशी करावी. उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. तसेच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला, त्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी चौकशीचे आदेश, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : अजित पवारांनी परळीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग
अजित पवारांनी परळीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8.00AM TOP Headlines 08.00AM 12 February 2025Top 70 | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : अजित पवारांनी परळीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग
अजित पवारांनी परळीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
एकनाथ शिंदेंच्या कौतुक सोहळ्यानंतर संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, थेटच म्हणाले...
Stock Market Crash: केवळ पाच दिवसात 18 लाख कोटी स्वाहा, स्टॉक मार्केटमध्ये धूळधाण, शेअर मार्केट इतकं का पडलं?
शेअर मार्केटमध्ये लाल चिखल, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले, घसरणीची नेमकी कारणं कोणती?जाणून घ्या
Embed widget