आंतरवालीत प्रचंड गोंधळ, मनोज जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे निघाले?
Manoj Jarange : जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे. मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहे. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाचा वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नयेत यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझा बळी घायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकील असेही जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत विशेष म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी गावकरी आणि आंदोलनक विनंती करत आहेत. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच जरांगे मुंबईच्या दिशीने निघाले आहेत.
जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न...
मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर थांबले असून, गावकऱ्यांकडून रुमालने हवा देण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पायी चालू नका अशी वनंती गावकरी करत आहे. सध्या आंतरवालीत मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळत आहे. शेकडो नागरिक जरांगे यांच्यासोबत रस्त्यावर आहेत. रस्ता मोकळा करून दिला जात आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनात फुट पाडली जात आहे : बाळासाहेब थोरात
मनोज जरांगे मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले असून, यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. यावर बोलतांना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "मनोज जरांगे एवढे का संतापले हे तपासले पाहिजे. आधी त्यांनी गुलाल उधळला होता, पण आता काय झाले हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे यांना माहित आहे. जरांगे अचानक का चिडले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात फुट पाडली जात असल्याचे सत्य आहे. जरांगे यांना फसवले जात असल्याने ते रागावले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :