एक्स्प्लोर

मंदीच्या काळात कळवणच्या शेतकऱ्यांची चांदी, एकाच दिवशी खरेदी केले 250 ट्रॅक्टर

कांदा विक्रीतून मिळालेल्या पैशातून शेतकऱ्यांनी ही खरेदी केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. पहिल्या माळेच्या एकाच दिवशी विविध शोरुममधून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचे जंगी स्वागत त्या त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रेड कार्पेट टाकून केले.

नाशिक : एकीकडे वाहन क्षेत्रात मंदी असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र एकाच दिवशी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी 250 ट्रॅक्टर एकाच दिवशी विकत घेतले आहेत. याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टा असलेल्या कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी नवरात्रीच्या पहिल्या माळेला विविध ट्रॅक्टरच्या शो रुममधून आपल्या आवडीचे ट्रॅक्टर्सची खरेदी केली आहे. दुष्काळी परिस्थिती असली तरी कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी चांगल्या पध्दतीने उन्हाळी कांद्याची लागवड केली आणि टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केली.  या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी चाळीत कांदा साठवणूक केलेला असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे परराज्यात कांद्याची कमतरता निर्माण झाली आणि नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला 5000 ते 4000 हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना खूप वर्षानंतर हाती चांगले पैसे मिळाले. त्यामुळे कळवण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ तर काही शेतकऱ्यांनी खाजगी फायनान्सच्या माध्यमातून ट्रॅक्टर तर काहींनी कार खरेदी केल्या आहेत. कांदा विक्रीतून मिळालेल्या पैशातून शेतकऱ्यांनी ही खरेदी केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. पहिल्या माळेच्या एकाच दिवशी विविध शोरुममधून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचे जंगी स्वागत त्या त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रेड कार्पेट टाकून केले. तसेच ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा फेटा बांधून सत्कार केले. शिवाय या शेतकऱ्यांना जेवणाची पंगत देण्यात आल्याचं बोललं जात आहे. एकीकडे देशात वाहन क्षेत्रात मंदी आल्याच बोलले जात असताना दुसरीकडे एकाच दिवसात 250 शेतकऱ्यांना सबसिडी, फायनान्सच्या माध्यमातून वाहन खरेदी करत असल्याच पाहावयास मिळत आहे. सध्या कांद्यावर निर्यात बंदी करण्यात आली असली तरी कांद्याच्या दर आजही 3000 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी कांदा साठवणूक केलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी दसऱ्याला ट्रॅक्टर, कार खरेदीसाठी बुकींग केल्याचं सांगण्यात येतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget