एक्स्प्लोर
पतंग काढताना पोटात रॉड घुसून मनमाडमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू
मनमाड : मनमाड शहरात पतंग काढताना पोटात रॉड घुसल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रोफेसर कॉलनीतील मोकळ्या जागेत पतंग पकडायला गेला असताना 13 वर्षांच्या आदित्य जाधवच्या पोटात लाकडी गेटचा धारदार रॉड घुसला.
मनमाड शहरातील पांडूरंग नगर येथे आदित्य राहत होता. खेळण्यासाठी तो आपल्या बहिणीसोबत मावशीच्या घरी आला होता. दुपारच्या सुमारास कटलेली पतंग घेण्यासाठी तो प्रोफेसर कॉलनी जवळच्या कंपाऊन्डमध्ये लोखंडी गेट उतरुन खाली उतरला.
पतंग घेऊन पुन्हा गेटवरुन खाली उतरत असताना त्याचा हात सटकल्याने गेटला लावलेला धारदार अणुकीदार रॉड पोटात लागल्याने तो जखमी झाला. परिसरातील नागरिक त्याला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. आदित्य जाधव हा नगरसुल मधल्या संत नारायणगिरी महाराज आश्रमात सहाव्या इयत्तेत शिकत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement