एक्स्प्लोर
अमरावतीत एकतर्फी प्रेमातून भर दिवसा युवतीची गळा चिरुन हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आरोपीने तरुणीवर तब्बल 17 वेळा चाकूने वार केले. या घटनेनंतर तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारा दरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

अमरावती : अमरावतीत एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं एका तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या चुनाभट्टी परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे दुपारी तीनच्या सुमारास 17 वर्षीय तरुणी आपल्या मैत्रिणींसह ट्यूशनला जात होती. त्यावेळी आरोपी किरण म्हस्के याने चाकूने वार करत तरुणीची हत्या केली. आरोपीने तरुणीवर तब्बल 17 वेळा चाकूने वार केले. या घटनेनंतर तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारा दरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या गटनेत तरुणीच्यासोबत असलेली मैत्रिणीसुद्धा जखमी झाली. VIDEO | अमरावतीत एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीची हत्या | एबीपी माझा युवतीच्या हत्येमुळे तिच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयात तणाव वाढल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला. यावेळी आरोपी किरण मस्केने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्याचा प्रयत्न फसला. अमरावतीकरांनी त्या पळ काढताना पाहिले आणि पकडून त्याला बेदम चोप दिला. नंतर आरोपीला त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















