एक्स्प्लोर

मोबाईलवर शिव्या देऊन बोलणं महागात, महिलेकडून तरुणाची हत्या

नागपूर : एका महिलेच्या घराजवळ बसून मोबाईलवर जोराजोरात संभाषण करणं आणि संभाषणात शिव्यांचा वापर करणे एका तरुणाला महागात पडलं आहे. कारण संबंधित महिलेने गुंडांकडून त्या तरुणाची हत्या केली. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या लिकेश साठवणे नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला असून, हत्येमागच्या कारणाने खळबळ उडाली आहे. लिकेश साठवणे याचा मृतदेह काल (17 एप्रिल) दुपारी वाठोडा परिसरात एका निर्जन ठिकाणी विहिरीत सापडले. ऑटो चालक असलेला 25 वर्षांचा लिकेश गेले आठ दिवस बेपत्ता होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, आज त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. चार महिन्यांपूर्वी पवनशक्ती नगरात एका सार्वजनिक बेंचवर बसलेल्या लिकेशचे जया शर्मा नावाच्या महिलेसोबत भांडण झाले होते. तेव्हा लिकेश मोबाईल फोनवर जोराजोरात बोलत होता आणि शिव्याही देत होता. त्यामुळे जया शर्मा आणि लिकेश यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा झालेला भांडण लिकेश विसरला होता. मात्र, इराने पेटलेल्या जया शर्माने लिकेश सोबत झालेल्या भांडणाचे सूड घेण्याचे ठरवले होते. तिने ओळखीतल्या गोपाळ बिसेनला लिकेशला संपवण्याची जबाबदारी दिली. त्यासाठी काही हजारांची रोकडही दिली आणि गुंड प्रवृत्तीच्या गोपाळने प्रफुल्ल गेडामच्या मदतीने 9 एप्रिल रोजी लिकेशला वाठोडा परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन चाकू भोसकून संपविले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला. लिकेशच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशय असलेल्या गोपाळ बिसेनला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर गणेश बिसेनने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात गोपाळ बिसेनला अटक केली असून सुपारी देणारी जया शर्मा आणि प्रफुल्ल गेडाम फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Buldhana Khadakpurna Dam: ऑक्टोबरमध्येच बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प कोरडाठाक! चार शहरांसह 40 गावांवर तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार
ऑक्टोबरमध्येच बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प कोरडाठाक! चार शहरांसह 40 गावांवर तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार
Gondia Accident News : गडचिरोली पोलिस दलातील वाहनाने महिलेला चिरडलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत, तर 2 वर्षीय चिमुकला गंभीर; गोंदिया-कोहमारा महामार्गावरील घटना
गडचिरोली पोलिस दलातील वाहनाने महिलेला चिरडलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत, तर 2 वर्षीय चिमुकला गंभीर; गोंदिया-कोहमारा महामार्गावरील घटना

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
Embed widget