एक्स्प्लोर

Pune Accident News : वाहनांचा वेग जीवघेणा! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; पुणे स्टेशन परिसरातील घटना

पुण्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. चांदणी चौकातील अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे स्टेशन परिसरात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

Pune Accident News : पुण्यात (Pune Accident News) अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. चांदणी चौकातील अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे स्टेशन परिसरात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वाहनाच्या धडकेने (Accident) पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विलास गावडे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या मृत्यू  (Death) झालेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती कळू शकली नाही आहे. मात्र या घटनेने पुणे स्टेशन परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशाल  गावडे अलंकार चित्रपटगृह परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव गाडीने गावडे यांना धडक दिली. यात गावडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहेत आणि पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनीच तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तपास सुरु आहे.

वाहनांना वेग जीवघेणा...
पुण्यात 13 मार्चला असाच अपघात झाला होता. त्या अपघातात आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न असल्याने तिला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका वडिलांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरेश सखाराम गवळी (वय 55) असे मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव होतं. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती. दोघेही नाशिकमध्ये राहत होते. अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.  

अपघाताचं सत्र थांबेना
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. या चालकांच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील , असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..Mahayuti Cabinet Minister : शिरसाट ते राणे, मंत्रिपद मिळताच अनेकांकडून अधिकारी फैलावरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Embed widget