Maharashtra Unlock | आजपासून राज्यातील मॉल, शॉपिंग सेंटर्स खुली; लसीकरणाच्या अटीला मात्र दुकानदारांचा विरोध
आजपासून राज्यातील मॉल्स, शॉपिंग सेंटर रात्री 10 पर्यत खुली राहणार आहेत. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेशासाठी घातलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.

मुंबई : आज रविवारपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकानं रात्री दहा वाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र, एकीकडे या निर्णयाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकान मालक एकीकडे दुकान रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत तर दुसरीकडे लसीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना प्रवेश मिळणार या घालून दिलेल्या नियमाचा मात्र कडाडून विरोध करत आहेत.
सामान्य दुकानात ज्याप्रकारे नियम आहेत आणि तशाच प्रकारचे नियम मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये दुकानांनासुद्धा असावेत असे दुकान मालकांचे म्हणणे आहे. मागील दीड वर्षापासून मोबाईल शॉपिंग सेंटरमध्ये दुकान मालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आता तो पूर्ववत होण्यासाठी पूर्वीसारखे कोणतेही नियम आमच्यावर लादू नये. शिवाय लसीकरणाची अट रद्द करून आम्हाला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी दुकान मालकांकडून केली जात आहे.
रुग्णसंख्या घटल्याने महाराष्ट्र अनलॉक
खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी
खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.
सिनेमागृह, मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंद
सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मंगलकार्यालयांना सूट
खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास!
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
