एक्स्प्लोर

Majha Katta : .. तर मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकमध्ये सलमानला घेतलं नसते, प्रवीण तरडेंचे रोखठोख मत

प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर प्रविण तरडेंनी एक खुलासा केला आहे

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जाणारा चित्रपट म्हणजे 'मुळशी पॅटर्न'. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.  लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर प्रविण तरडेंनी एक खुलासा केला आहे.  जर हा चित्रपट मी केला असता तर सलमान खानला या चित्रपटात मी घेतले नसते, असे मत प्रविण तरडेंनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रवीण तरडे म्हणाले, मुळशी पॅटर्न हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित बनवलेला सिनेमा आहे. मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी आली होती परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही. हा चित्रपट जर प्रवीण तरडेने बनवला असता तर या सिनेमाचे नाव आणि कथानक कधीच बदलले नसते. हिंदीमध्ये देखील मी चित्रपटाचे नाव मुळशी पॅटर्न ठेवले असते. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो. त्या विषयावर मी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात मी सलमान खानला कधीच घेतले  नसते. कारण सलमान या भूमिकेसाठी कधी सूट झाला नसता.

कलाकारांच्या निवडीवर विचारलेल्या प्रश्नावर प्रवीण म्हणाला, 'माझ्या चित्रपटांमधील कलाकारांची निवड ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. सध्या मराठी चित्रपट 'धर्मवीर',ची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. चित्रपट धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिनेता प्रसाद ओक यानं आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. चित्रपटाची कथा, मांडणी, कलाकार, संगीत सगळ्याच बाबतीत चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. 

प्रवीण तरडे म्हणाले,  मुळशीसारख्या गावाची झालेली वाताहत लोकांसमोर आणावी असे आपल्याला वाटले. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो  आणि त्यानंतर याच गावात जमिनी विकून पेटीभर पैसे घेऊन सधन शेतकरी म्हणून मिरवलेले लोक  नंतर पैसे संपल्यावर आपल्याच जागांवर उभ्या राहिलेल्या 'आयटीपार्क' आणि इतर उद्योगांमध्ये सुरक्षारक्षक  म्हणून कसं काम करू लागले. याच शेतकऱ्यांच्या घरात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलं तरुण झाली.  शेतकरी शेतीचा मालक नसून रखवलदार आहे. एका पिढीकरून दुसऱ्या पिढीकडे वारशाने ही जात असते. मातीशी नाते कधीच विकता कामा नये.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget