Majha Katta With Kaddeshwar Mahraj: वेस्टपासून वेल्थ कशी निर्माण करायची, काढसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितला मंत्र
Majha Katta With Kaddeshwar Mahraj : ''भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो'', असं कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले आहेत.
Majha Katta With Kaddeshwar Mahraj : ''भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो'', असं कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले आहेत. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा'मध्ये बोलताना त्यांनी हे माहिती दिली आहे. कणेरी मठाच्या वतीने 'पंचभौतिक उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. याआधी असाच एक उत्सव मताच्या वतीने 2015 मध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यानंतर आता हा आयोजित करण्यात येत आहे.
'पंचभौतिक उत्सव' आयोजित करण्यामागचं नेमकं काय कारण आहे? यावर बोलताना काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, ''आम्ही दर दिवशी समाजात जे पाहतो आणि मी जिथे राहतो, त्याच्या अवतीभवतीचा परिसरात पाहत असतो. 2005 ते 2015 पर्यंत महापुराचा विळखा कोल्हापूर आणि कोकणात पडला. त्याचबरोबर मटाचे स्वतःचे रुग्णालय असल्याने आम्ही दर दिवशी नवनवीन आजार येताना पाहत आहोत. आज कोल्हापुरात कर्करोगाची अनेक रुग्णालय आहेत. कोल्हापूरचं दरडोई उत्पन्न भारतात सर्वात चांगलं आहे. कोल्हापुरात कर्करोगाचे पाच रेडिएशन सेंटर आहेत. एका सेंटरमध्ये दर दिवशी 100 ते 200 रुग्ण रेडिएशन उपचार घेतात. भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. याचपद्धतीने जे असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण ही खूप आहे. अकाल मृत्यूचे प्रमाण 70 टक्के आहे. ज्या वयात मृत्यू व्हायला नको, त्या वयात माणसांचा मृत्यू होत आहे. यामागे आपली बदलेली जीवनशैली आणि बिघडलेलं निसर्ग किंवा पंचमहाभूांतचं असंतुलन हे कारण असल्याचं वाटतं. याबद्दल जनजागृती निर्माण करावी म्हणून पंचभौतिक उत्सव आयोजित करण्यात येतो.
Majha Katta With Kaddeshwar Mahraj : चार ते पाच लोकं सेंद्रिय शेतीकडे वळले : काढसिद्धेश्वर महाराज
काढसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, 2015 मध्ये संस्कृती उत्सव केला होता. त्यात सेंद्रिय शेतीला विशेष महत्व देण्यात आलं होतं. यात आपण देशी गौसंप्पती वाढवण्याचा प्रयत्न केला होता. याचा परिणाम इतका चांगला झाला आहे की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्या शेजारील राज्यातील चार ते पाच लोकं सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
Majha Katta With Kaddeshwar Mahraj : 'वेस्टपासून वेल्थ'
वस्तूचे रिसायकलिंगचे महत्व सांगतांना काढसिद्धेश्वर महाराज म्हणाले, पंचभौतिक उत्सवात पंचमहाभूत आणि आरोग्य याची एक गॅलरी बनवण्यात आली आहे. यातच एक रिसायकलिंग गॅलरी बनवली आहे. ज्यात प्लास्टिक, ई-वेस्ट , कापड, कचरा या गोष्टींची रिसायकलिंग कशी करता येईल आणि वेस्टचं वेल्थमध्ये कसं परिवर्तन करता येईल, याबद्दल माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, आठ-दहा गावचे तरुण एखादा स्टार्टअप प्रोग्रॅम म्हणून ई-वेस्टचं उपयोग करायचं ठरवलं, तर त्यांना वेस्टपासून वेल्थ मिळू शकते आणि त्यांना उद्योग कसा मिळेल हे देखील या उत्सवात ठेवण्यात आलेल्या गॅलरीमध्ये सांगण्यात आलं आहे.