Majha Katta : मालिकेचा लेखक ते प्रयोगशील दिग्दर्शक, 'कोर्ट' फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा प्रेरणादायी प्रवास
कोरोनाचा काळ हा सर्व चित्रपट निर्मात्यांसाठी कठीण काळ होता. आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणे ही फार मोठी गोष्ट नाही, असे चैतन्य ताम्हाणे म्हणाले.
मुंबई : कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट लिहणे अत्यंत कठीण असते. लिखाण हे 'अॅक्ट ऑफ करेज' आहे. कारण फिअर ऑफ फेल्युअर हे कायम डोक्यात असते. त्यामुळे मला लिखाण हे कायमच कठीण वाटते, असे मत ‘कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केले. चैतन्य ताम्हाणे ( Chaitanya Tamhane) आज माझा कट्ट्यावर (Majha Katta) बोलत होते.
चैतन्य ताम्हाणे म्हणाले, मला एखादी स्क्रिप्ट लिहण्यासाठी दोन महिने पुरेसे होतात. परंतु सुरूवात करण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागतात. मी दरवेळी लिहिताना विचार करतो की, पुन्हा कधीच लिहिणार नाही. परंतु एकदा तुमची स्क्रिप्ट पूर्ण झाली की तुम्हाला समाधान मिळते.
ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल काय वाटते?
कोरोनाचा काळ हा सर्वच फिल्ममेकर्ससाठी कठीण काळ होता. आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणे ही फार मोठी गोष्ट नाही. ओटीटीचे जेवढे फायदे आहे तेवढे तोटे देखील आहे.
सोशल मीडियापासून का दूर आहे?
सोशल मीडियापासून मी ठरवून लांब आहे. मला सोशल मीडियाची भीती वाटते. सोशल मीडीयाचे जेवढा फायदा आहे तेवढाच तोटा देखील आहे.
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली पाडली आहे. कोर्ट, डिसायपल हे त्यांचे मराठी चित्रपट आहे. डिसायपल हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. तब्बल 20 वर्षांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणारा डिसायपल हा पहिला भारतीय सिनेमा ठरल्याने या सिनेमाचं कौतुक करण्यात आलं. या सिनेमासाठी चैतन्य ताम्हणे यांनी पाच वर्षे मेहनत घेतली. यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला . शास्त्रीय संगीतातील अनेक संगीतकार आणि जाणकारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून शास्त्रीय संगीताचा खोलवर अभ्यास केला.
'कोर्ट' फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा प्रेरणादायी प्रवास