एक्स्प्लोर
ऐन उन्हाळ्यात महावितरणकडून लोडशेडिंगचा शॉक
मुंबई : ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या ग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यभरात गरजेनुसार सर्व ठिकाणी महावितरणकडून भारनियमन लागू केले जाणार आहे.
औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. जवळपास 4100 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे.
कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पावर प्लांट आणि NTPC मधून महावितरणला वीज उपलब्ध झाली नसल्याने भारनियमनाचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
महावितरणच्या या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून शेतीपंपांचा वीज पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement