एक्स्प्लोर

नवी मुंबईत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, मनोमिलन मेळाव्याचं आयोजन

नवी मुंबई महापालिकेवरील गणेश नाईकांची म्हणजे भाजपची सत्ता रोखण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. गणेश नाईकांनी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला अडचणीत आणत भाजपमध्ये प्रवेश केलाय. म्हणून दोन्ही पक्षांची गणेश नाईकांना रोखण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता असून याठिकाणी आमदार गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. गणेश नाईक शिवसेना, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळेच गणेश नाईक यांना दणका देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. भाजपा हातून नवी मुंबई महापालिकेची सत्ता खेचून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जोरदार तयारी करत आहेत. याचाच भाग म्हणून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून विश्वजीत कदम, अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर आली असल्याने येथील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. तीन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याने तिकीट वाटपावरुन बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीने ही बंडखोरी रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरु केले आहेत.

भाजपची पर्यायाने गणेश नाईकांची सत्ता रोखण्यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागावं, असं आवाहन आजच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. बंडखोरी करून पक्षाला, महाविकास आघाडीला अडचणीत आणू नका, अशी भावनिक सादही घातली जाणार असल्याची शक्यता आहे.

एकीकडे महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असताना, भाजपाने मात्र आपल्यासमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडे असलेल्या शहरांची बिकट अवस्था असून नवी मुंबईचा आपण सर्वांगीण विकास केला आहे. नवी मुंबईकर आम्हाला गेल्या 25 वर्षांपासून निवडून देत आहेत, असं भाजप नेते गणेश नाईक यांनी म्हटलं. दुसरीकडे भाजपातही सर्व काही आलबेल नसून जुनी भाजपा आणि पक्षात नवीन आलेले गणेश नाईकांची भाजप असे दोन गट पडले आहेत. कोणत्या गटाला उमेदवारी द्यायची यावरुन भाजपातही वाद सुरु झाले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

भाजपा - 60 नगरसेवक शिवसेना - 38 नगरसेवक काँग्रेस - 10 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस - 3 नगरसेवक

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2026 | बुधवार
Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
Thane News : वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Embed widget