एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

फ्यूज उडाले नाही तर महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल : अब्दुल सत्तार

दोन महिन्यात सरकार येईल हे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी दिलेलं गाजर असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं .

नांदेड : मराठवाडा पदवीधर निवडणूक महाविकास आघाडीची सभा आज नांदेड येथे पार पडली. मात्र यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. अशोक चव्हाण आणि अजित पवार यांचे फ्यूज उडाले नाही तर महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल हे ही सांगायला सत्तार विसरले नाहीत. सत्तार यांनी आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. तर दोन महिन्यात सरकार येईल हे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी दिलेलं गाजर असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबरला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंग गायकवाड यांच्या विशेष उपस्थितीत नांदेड येथील ओम गार्डन येथे शुक्रवारी पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळावा पार पडला.

काय म्हणाले सत्तार?

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना अशोक चव्हाण यांचा उल्लेख माझे जुने आणि नवे नेते म्हणत थोडासा विराम दिला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. कमी वेळात जास्त बोलायचं आहे. एका चव्हाण साहेबांच्या साम्राज्यामध्ये दुसऱ्या चव्हाण साहेबांचा प्रचार करायचा म्हणजे, तुम्हारे खत मे हमारा सलाम असल्याचं सत्तार म्हणाले. एका वर्षानंतर हा बॅकलॉग आहे.अशोक चव्हाण यांच्यासोबत बोलण्याचा सन्मान मिळालाय. खरं तर अमर राजूरकर यांचे आभार मानले पाहिजेत कारण महादेवाकडे जायला नंदीला सलाम करावा लागतो असं म्हणत राजूरकर यांना टोला लगावताच एकदा सभागृहात हशा पिकला. रावसाहेब दानवे यांचाही चकवे मामा म्हणून सत्तार यांनी उल्लेख केला. दोन महिन्यात सरकार बदलणार.. रावसाहेब दानवे काय म्हणतात हे मला चांगलं माहित आहे. सरकार पाच वर्षे नाहीतर पंचवीस वर्षे टिकेल. हे दोघं एकत्र राहिले आणि उद्धवजी मुख्यमंत्री राहिले तर? ज्या दिवशी या लाईनमध्ये फॉल्ट आला फ्यूज उडाला तर त्यांची गरजही पडणार नाही असेही सत्तार म्हणाले..

सत्तार यांच्या भाषणानंतर अशोक चव्हाण सत्तार यांच्या कोटीला उत्तर देतील असं वाटत होतं. मात्र अशोक चव्हाण यांनी सत्तार यांच्या नामोल्लेख करणे देखील टाळलं. शिवसेनेचा कार्यकर्ता गल्लीबोळात काम करतोय.तीनही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे उमेदवार निवडून येईल. राज्यातील कोरोना जाईल पण भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भाजपाचे काही नेते कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी हे सरकार जाईल असं म्हणतात. आलेल्या लोकांना सांभाळण्यासाठी हे सरकार जाईल असे म्हणव लागते. हे सरकार बोलबच्चन आहे असं दानवे म्हणतात. यावर उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, आमच्यावरचे आरोप तुम्हालाच तंतोतंत जुळतात. त्यामुळे बोलबच्चन सरकार आमचं नाही तर केंद्रातील तुमचं सरकार बोलबच्चन आहे.

फडणवीसांनी दिल्लीत जावं : चव्हाण

या वेळी बोलताना चव्हाण यांनी फडणवीस यांना दिल्लीत जाण्याचा सल्ला दिला. फडणवीस यांचं नांदेडवर खूप प्रेम आहे. नांदेडला येत राहतात ,आश्वासन देत राहतात. फडणवीस यांना चिंता आहे की माझं काय होणार. भाजपात चर्चा सुरू आहे फडणवीस केंद्रात जाणार आहेत. माझी त्यांना शुभेच्छा आहेत. फडणवीस केंद्रात गेल्यावर महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील. महाराष्ट्राचे प्रश्‍न केंद्रात सुटत नाहीत फडणवीस दिल्लीत गेले तर जीएसटीचे पैसे मिळतील. महाराष्ट्रात शेतकऱ्याचे कायदे चुकीचे होणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनगरांचा आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं, ते पूर्ण होईल, मराठ्यांच आरक्षण मिळेल.त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकलो तर फडणवीस हे दिल्लीत जातील हे मी तुम्हाला सांगतो. फडणवीसांना दिल्लीत पाठवण्यासाठी सतीश चव्हाण यांना मतदान करण्याचा आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं.

दोन महिन्यात सरकार येईल हे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी दिलेलं गाजर : अजित पवार

सतीश चव्हाण यांच्या प्रचार मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझ्या 30 वर्षच्या राजकारणात या तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवली नाही. वेळ कमी आहे आता एकोप्याने काम करण्याचा सल्ला दिला. मराठा आरक्षणावर बोलताना अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षणावरून दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा काम कोणी करू नका. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संघटना पुढे येतात, काही संघटना ओबीसीच्या संदर्भात असं वातावरण निर्माण करतात की त्यांचं आरक्षण कमी होईल. परंतु महाविकास आघाडी कुठलही आरक्षण देत असताना, दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्याबद्दल ते निर्णय घेतले पाहिजेत ही आमच्या सगळ्यांचे भूमिका आहे .

लातूर-नांदेड रस्त्याबाबत काय म्हणाले अजित पवार?

लातूरवरुन नांदेडला यायला अडीच तास लागले पाहिजेत, मात्र पाच तास लागतात असं अशोक चव्हाण, विक्रम काळे म्हणत होते. केंद्र सरकारने या कामाचे टेंडर काढले आहेत, हे टेंडर कोणाला मिळाले, कोणाला विकले याबद्दल केंद्राने आढावा घेतला पाहिजे. राज्य सरकारची पण जबाबदारी आहे. यावर आम्ही अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे मार्ग काढत असल्याचे ही अजित पवार म्हणाले.

भाजपावाले बावचळून उठतात :अजित पवार

इतिहासात संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे तसं भाजपवाले बावचळून उठतात. चंद्रकांतदादा सारखा प्रदेशाध्यक्ष आपण काय बोलावं, कोणाबद्दल बोलावं, कसं बोलावं आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आपण काय बोलतो आपली कुवत काय ?कोणाबद्दल बोलतो याचा विचार करत नाही. सतत म्हणतात मी उद्या येईल मी उद्या येईल. आपल्या जवळची माणसं जाऊ नयेत, म्हणून कार्यकर्त्यांना सतत सांगावं लागतं आपली सत्ता येणार आहे. सतत कार्यकर्त्यांना गाजर द्यावं लागतं असला धंदा भाजपाचा चालला असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

रस्ता दुरुस्त होत नसतील तर अशोक चव्हाणांनी औरंगाबादला यावं : अब्दुल सत्तार 

अजित पवार नांदेड मध्ये आल्यानंतर अशोक चव्हाण यांचा पाहुणचार घेतला. शंकरराव स्मृती संग्रहालला भेट देत. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतलं. अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची खेचण्याची संधी सोडली नाही.औरंगाबाद नांदेड रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल बोलताना सत्तार म्हणाले, माझे मित्र म्हणतात नांदेडला येणारे रस्ते एवढे खराब आहेत की अशोक चव्हाण यांना सांगा एक तर रस्ते दुरुस्त करा नाही तर औरंगाबादला राहायला यायला सांगा. याच प्रश्नाला पुढे नेत अजित पवार म्हणतात की, होय लोकांनी मला सांगितले लातूरहून जाऊ नका. म्हणून मी विमानाने आलो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget