ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त
येत्या 27 किंवा 30 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा मंत्री 27 किंवा 30 तारखेला शपथ घेतील, अशी शक्यता आहे.
मुंबई : हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी विधान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला असल्याचं कळतंय. आता 27 किंवा 30 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. काँग्रेसकडून मंत्रिमंडळात पाठवण्यात येणाऱ्या नेत्यांची अंतिम यादी तयार नसल्यानं मंत्रिमंडळ रखडत असल्याची माहिती मिळाली आहे. आज रात्री काँग्रेसची यादी तयार झाल्यास पुन्हा तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा होऊ शकते. उद्या दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय मिळू शकतो.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी सहा मंत्र्यांचं तात्पुरतं खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झालं. मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना होती.
23 किंवा 24 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. 27 किंवा 30 डिसेंबरला हा मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

शिवसेनेची संभाव्य यादी
रामदास कदम अनिल परब सुनील प्रभू दीपक केसरकर उदय सामंत तानाजी सावंत गुलाबराव पाटील आशिष जैस्वाल संजय राठोड सुहास कांदे
काँग्रेसची संभाव्य यादी
अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर सुनील केदार सतेज पाटील के. सी. पाडवी विश्वजीत कदम
राष्ट्रवादीची संभाव्य यादी
अजित पवार दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड हसन मुश्रीफ नवाब मलिक राजेश टोपे अनिल देशमुख
महाविकास आघाडीचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर
एकनाथ शिंदे : गृह विभाग, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
सुभाष देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास
छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
जयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास
बाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष