एक्स्प्लोर

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, अर्थव्यवस्थेत 7.5 टक्क्यांची वाढ, कृषी-उद्योगात घट अपेक्षित

मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात आठ टक्के घट अपेक्षित असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे

मुंबई : 2018-19 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला आहे. अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के वाढ अपेक्षित आहे, तर कृषी आणि उद्योग दरात घट अपेक्षित आहे. गेल्या वेळीही इतकाच म्हणजे 7.5 टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज होता. महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात आठ टक्के घट अपेक्षित असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यात 1.1 टक्क्यांची अल्पशी वाढ दिसून येत आहे. राज्याच्या दरडोई उत्पादनात यंदा कोणतीही वाढ झालेली नसून दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटकचे दरडोई उत्पन्न दोन लाख 7 हजार 62 रुपये, तेलंगणाचे दोन लाख 6 हजार 107 रुपये, तर महाराष्ट्राचे एक लाख 91 हजार 827 रुपये आहे. या परिस्थितीमुळे राज्याचा विकासदर 7.5 टक्के इतका राहणार असून गेल्या वर्षीही हा विकास दर 7.5 टक्केच होता. सिंचनाची आकडेवारी यंदाही गायब सिंचन घोटाळ्याची चर्चा झाल्यानंतर राज्यातील सिंचनाची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालात देणंच बंद करण्यात आलं आहे. यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नसल्याचा उल्लेख आहे. 2010-11 पासून सिंचनाची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालात देणं बंद करण्यात आलं आहे. या सरकारनेही मागील पाच वर्षात ही आकडेवारी उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे पाणी कुठं मुरतंय, असा सवाल उपस्थित होतो. आर्थिक पाहणी अहवालावर एक कटाक्ष - कृषी आणि उद्योग दरात घट अपेक्षित - कृषीच्या दरात 2.8 टक्क्यांची घट अपेक्षित, 2018-19 वर्षात कृषी दर 0.4 टक्के असण्याचा पूर्वानुमान. 2017-18 साली हा दर 3.1 टक्के होता - उद्योग क्षेत्राचाही दर 0.7 टक्क्यांनी घट अपेक्षित, 2017-18 मधील 7.6 टक्क्यांवरुन 2018-19 साठी 6.9 टक्क्यांइतका घसरण्याचा पूर्वानुमान - सेवा क्षेत्रात 1.1 टक्के वाढ अपेक्षित, 2017-18 मधील 8.1 टक्क्यांवरुन 2018-19 साठी 9.2 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा पूर्वानुमान - किती क्षेत्र सिंचनाखाली आहे याची यंदाच्याही आर्थिक पाहणी अहवालात माहिती नाही - महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक - एक लाख 91 हजार 828 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget