(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राला हुडहुडी... राज्यात पुढील दोन महिने गुलाबी थंडी, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Winter Updates : अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिराच आगमन झालं. पण आता ही थंडी 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम राहणार आहे.
Maharashtra Winter Updates : मागील आठवडाभरापासून राज्यात गुलाबी थंडी पडली आहे. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत.
अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिराच आगमन झालं. पण आता ही थंडी 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम राहणार आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हाआम्हाला घेता येणार आहे. त्यात आज आणि उद्या तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर आताच 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील 48 तासात थंडीचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागातील तापमान 8-9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातल्या काही शहरांमधील किमान सरासरी तापमान :
नागपूर : 7.8
अमरावती : 8
गोंदिया : 8.2
वर्धा : 9
शिरुर : 9.1
ब्रह्मपुरी : 10
बुलढाणा : 10.5
औरंगाबाद : 10.6
जालना : 10.8
पुणे : 11.2
नाशिक : 11.4
उस्मानाबाद : 11.3
बारामती : 11.2
सातारा : 12
महाबळेश्वर : 12.3
नांदेड : 12.5
कोल्हापूर : 15.7
पाहा व्हिडीओ : उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली
परभणी गारठली
मागच्या 4 दिवसांपासून परभणी जिल्हा थंडीने गारठला आहे. जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली राहत असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी पडलीय. आज जिल्ह्याचे तापमान हे 9.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रात्री बरोबरच सकाळी ही शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत. सकाळी नागरिक या थंडीचा आनंद ही घेताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागातून शहरात येत घरोघरी दूध पोचवणाऱ्या दूध विक्रेत्यांना ही थंडीने चांगलेच गारठून गेले आहेत.
धुळे-सोलापूर महामार्ग हरवला धुक्यात
मागच्या चार दिवसापासून बीड जिल्हा मध्ये जोरदार खंडित आगमन झाला आहे आणि या थंडीमुळे बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर अशी धुक्याची चादर पसरण्याची पाहायला मिळाली अगदी पाण्यावर दवबिंदुं हे असे काही आवरण जमा झाले की या सिंधफणा नदी च्या काठावर सगळीकडे असे दृश्य पहायला मिळतेय.. तर धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने वाहनाचा वेग देखील कमी झाला आहे.
गोंदियात नगरपंचायत निवडणुकींचा प्रचार भर थंडीत
गोंदिया जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण तापलंय. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारही आता शेकोट्यांचा आधार घेताहेत. विदर्भात गोंदिया जिल्ह्याचं तापमान सर्वात खाली घसरलंय. अगदी तापमानाचा पारा 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. उद्या म्हणजे 21 डिसेंबरला 106 नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचार करताना उमेदवारांना आता भरथंडीत ऊबदार कपडे घालून नागरिकांच्या शेकोट्याच्या ठिकाणी जावं लागत आहे.
दरम्यान, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये थंडीची लाट कायम आहे. तसेच पुढील तीन दिवस थंडी कायम राहणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश इथेही पारा घसरला असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा