एक्स्प्लोर

नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार, जानेवारीत कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे.

Maharashtra Weather New Year : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरम्यान, या नवीन वर्षात नेमकं वातावरण कसं असेल, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.1 जानेवारीपासून महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नसल्याची माहिती पंजाबराव डखांन दिली आहे.  आज राज्यात कडाक्याच्या थडीचा अंदाज डखांनी वर्तवला होता. त्यानंतर मात्र, राज्यात थंडीचा जोर वाढणारक आहे. त्यामुळं नागरिकांनी वाढत्या थंडीमुळं योग्य ती काळजी घेण्याच आवाहन करण्यात आलं आहे.

1 जानेवारीपासून 15 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार

पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारीपासून 15 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीने होणार असा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे. त्यामुळं वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी  दिलेल्या माहितीनुसार, 3 जानेवारीपासून त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार दिनांक 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक, नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात त्या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील खुळे यांनी दिली आहे. पुढचे काही दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे.  विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : वातावरण निवळणार, थंडी वाढणार, पुढील 3 दिवस राज्यात कसं असेल हवामान?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी देणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Embed widget