राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस कसं असेल हवामान?
आजही हवामान विभागानं (IMD) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी (Orange alert) करण्यात आलाय.
Maharashtra Weather News : राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही भागात उन्हाच्या झळा लागत आहे. सातत्यानं राज्यातील हवामान बदल (Climate change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान, आजही हवामान विभागानं (IMD) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी (Orange alert) करण्यात आलाय. तर मराठवाड्यासह मध्य पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
विदर्भातील 'या' जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. दरम्यान विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
ऑरेंज अलर्ट म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना हवामान विभागाकडून दिल्या जातात.
नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप
नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काल रात्री जोरदार मेघगर्जनेसह नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज नागपूरसह गोंदिया, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तर गडचिरोली चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि भंडारा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. गेले दोन दिवस विदर्भातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचा नुकसान होत आहे. मात्र, अवकाळी पावसामुळं तापमानात घसरण होऊन एप्रिल महिन्यात दिसून येणारा कडक वैदर्भीय उन्हाळा सध्या तरी दिसून येत नाही.
मुंबईचा पारा वाढला
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि चटके जाणवत आहेत. आज सांताक्रुझ येथे तब्बल 37 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. बोरिवली, मुलुंड, पवई, वरळी येथेही पारा 32 अंश सेल्सियसच्या पुढेच होता. राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळं महाराष्ट्रात चटके बसत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रावरुन महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळं आर्द्रता प्रचंड वाढली आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. अरबी आणि हिंद महासागरात हवेच्या कमी दाबामुळं पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही उष्णता कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या: