एक्स्प्लोर

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार, 'या' भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज? 

Weather : 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Temperature : 'या' जिल्ह्यात तापमानात घट होण्याचा अंदाज 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव (Jalgaon), औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna) आणि नाशिकात (Nashik) तापमान पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये एक अंकी तापमान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हुडहुडी भरणार असून शेकोट्या पेटणार आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसात राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. आता पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Climate Chnage : वातावरणात बदल, शेती पिकांवर परिणाम

राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही भागात बदलत्या हवामानाचा केळी पिकावर देखील परिणाम झाला आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : हवामान बदलाचा शेती पिकांना फटका, बुलढाण्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget