एक्स्प्लोर

राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?

या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तोंडचा घास हिरावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Maharashtra Weather Update:गेल्या 24 तासांपासून राज्यभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होताना दिसतेय.  पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसत आहे.  पुढील 4 दिवस राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे इशारे देण्यात आले आहेत. मराठवाडा, विदर्भसह मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाचे हाय अलर्ट देण्य्त आलेत. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने धाराशिवसह बीड आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Weather Update)

या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तोंडचा घास हिरावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (Hailstrom)

कमी दाबाचा पट्टा सक्रिय

हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ ते दक्षिण भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यभर पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धाराशिव जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. 

जळगाव जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, बाजरी तसेच कांदा बियाणे पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून मार्च-एप्रिल या उन्हाळ्याच्या काळात जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील पंधरवड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी काढणीसाठी तयार असलेल्या गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी सावरत नाहीत तोच काल रात्री पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धडक दिली. जळगाव, भुसावळ, एरंडोल, धरणगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचे नुकसान अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

नांदेड जिल्ह्यातही अवकाळीचा फटका

नांदेड जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, मका तसेच काढून ठेवलेल्या हळदीसह विविध शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले असून तोंडचा घास हिरावल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. नांदेड, भोकर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील लहान गावात वीज पडून एका शेतकऱ्याची गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आज कुठे अलर्ट?

आज नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde:  सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget