Maharashtra Weather Update: मुंबईत पुढील 48 तास पावसाची शक्यता, राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update: मुंबईच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईकरांची नववर्षाची पहाट अनपेक्षित पावसाच्या (Mumbai Rains) सरींनी झाली. हवामान खात्याने (IMD) थंडीची शक्यता वर्तवली असतानाच पहाटे अचानक पावसाने हजेरी लावल्याने सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, उपनगरांसह नवी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
पावसानंतर शहरात थंड वारे वाहू लागले असून, मुंबईच्या तापमानात (Temperature) लक्षणीय घट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. याचबरोबर वायू प्रदूषणाची पातळीही काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
Mumbai Weather Update: पुढील 48 तास ढगाळ वातावरण
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील 48 तास आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. त्यानंतर हळूहळू तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सध्या थंड वाऱ्यांमुळे गारठा कायम राहणार आहे.
Maharashtra Weather Update: थंडी आणि धुक्याचा प्रभाव वाढणार
अरबी समुद्रातून येणाऱ्या आद्रतेने भरलेल्या वाऱ्यांसह पश्चिमेकडून येणाऱ्या थंड प्रवाहामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका आणि सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Maharashtra Weather Update: किमान तापमानात मोठी घसरण
महाराष्ट्रातील अनेक भागांत किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी येथे सर्वात कमी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, धुळ्यात किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. शहरांमध्ये थंड वारे वाहत असून, पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Vidarbha Marathwada Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात थंडीचा कडाका
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या तीव्र थंडी जाणवत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांतील सर्वात थंड डिसेंबर महिना नोंदवला गेला. गेल्या सुमारे 15 दिवसांपासून अनेक भागांत तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार दिवस विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडी कायम राहणार असून, दाट धुक्यामुळे दृश्यमानतेत घट होण्याची शक्यता आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























