एक्स्प्लोर

राज्यात किमान तापमान वाढलं, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात पुढील 2 दिवस हवामान कसे? IMD ने सांगितलं..

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय राहणार आहे .

Weather Update:राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे प्रचंड गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी हवामान स्थिती नागरिक अनुभवत आहेत . पहाटे 10 अंशांच्या खाली गेलेले तापमान 16 ते 18 अंशापर्यंत जाऊन स्थिरावत असल्याचे चित्र आहे .दरम्यान अनेक भागात किमान तापमान वाढ होत असल्याचं सांगण्यात आलंय .गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील तापमान 1 ते 3 अंशांनी वाढलेआहे . तर बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशापर्यंत गेल्याची नोंद झाली . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या 3 - 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंशांची वाढ होणार आहे . त्यानंतर हळूहळू तापमान पुन्हा कमी होईल . विदर्भात पुढील 48 तास तापमानात फारसा बदल होणार नाही .त्यानंतर 2 ते 3 अंशांनी किमान तापमानाचा पारा वाढेल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलाय . (IMD Forecast)

हवामान विभागाचा अंदाज काय ?

सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर पाकिस्तानासह पश्चिम राजस्थान परिसरात आहे . पश्चिमी चक्रवाताचा सक्रिय प्रभाव असल्याने पंजाब ,हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय . तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय राहणार आहे .किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय .(Maharashtra Temperature)

राज्यात तापमानाचा पारा किती ?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 10° ते 19 अंशापर्यंत जाऊन पोहोचलं आहे . मंगळवारी पुण्यात बहुतांश ठिकाणी 12 ते 15 अंश सेल्सिअसची नोंद झाली . नाशिक मध्ये 15.3°,कोल्हापुरात 16 अंश,नगर 11.4°,सातारा 16.2,सोलापूर 16.5अंशांवर गेले होते.मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमान 14 ते 17 अंशांच्या दरम्यान राहिले.विदर्भात मात्र किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता.भंडारा गोंदिया, नागपूर जिल्ह्यात 10 ते 13 अंश सेल्सिअस ची नोंद झाली.उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान वाढ झाली होती. (Weather Update)

मराठवाड्यात हवामान अंदाज काय?

मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी मराठवाडयाच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी किंचित घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किंचित घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget