एक्स्प्लोर

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी! थंडीचा कडाका वाढल्याने शेकोटीचा आधार, पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता

Cold Wave in Maharashtra : राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता असून डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Weather Update Today : राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Forecast) तापमानातही कमालीची घट झाली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. 

उबदार कपडे अन् शेकोटीचा आधार

राज्यात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवेल. जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जळगावमध्ये तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरलं आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच गुळाचा चहा, मिरची भजे आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी जळगावकरांनी गर्दी केल्याचं चित्र जळगावमध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. 

येवल्यात पसरली दाट धुक्याची चादर

पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी पडू लागल्याने नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता नाशिकच्या येवला शहरासह परिसरात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे. दाट धुक्यामुळे परिसरातील शेत तसेच रस्ते देखील दिसून येत नसल्याचे चित्र होते. 'मॉर्निंग वॉक' ला जाणाऱ्या येवलेकरांनी या गुलाबी थंडीसह दाट धूक्याच्या चादरीचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, या धुक्याचा परिणाम शेतीपिकांवर होणार असून गारपिटीमूळे वाचलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.

अवकाळी पावसानंतर वातावरणात कमालीचा गारवा 

हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते. धुके इतके दाट प्रमाणात होते की, अगदी 200 मीटर पर्यंतही दिसत नव्हतं. दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे याचा फटका सकाळी हिंगोली शहरात येणारे दूधवाले, शाळकरी मुले, यासह भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी यांना बसतोय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Weather Update : काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी, 'या' भागात पावसाची शक्यता; महाराष्ट्रासह उत्तर भारत गारठला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Ajit Pawar : सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
Praniti Shinde: 'लाव रे तो व्हिडिओ...',  खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
'लाव रे तो व्हिडिओ...', खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Ajit Pawar : सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
Praniti Shinde: 'लाव रे तो व्हिडिओ...',  खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
'लाव रे तो व्हिडिओ...', खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
Embed widget