Maharashtra Weather: पहाटे गारवा, दुपारी उष्मा! राज्यात हवामानाचा अंदाज काय? कुठे पाऊस, कुठे थंडी? : IMD
पुढील आठवडाभर तापमानातील चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Maharashtra weather forecast: गेल्या काही दिवसांपासून नागरिक हवामानातील सततच्या बदलामुळे तापमानात चढउतार अनुभवत आहे, दिवसभर कडक उष्मा आणि संध्याकाळी 7 नंतर पहाटेपर्यंत तापमानात लक्षणीय घट अशी परिस्थिती निर्माण होत आहे . या हवामान बदलाचा विशेषतः शेतकऱ्यांवर परिणाम होत असून ऐन हिवाळ्यात अवकाळी उष्णतेशी झगडत आहेत. (IMD forecast) मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये असेच बदल होत आहेत, जिथे दिवसाचे तापमान सर्वाधिक नोंदवले जात आहे . (Weather update)
हवामान विभागाचा अंदाज काय ?
पुढील आठवडाभर तापमानातील चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर थेट परिणाम होत असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान , पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला असून, वायव्य भारताला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्तर भारतातील मैदानी भागात हलकीशी थंडी जाणवत आहे . तर राज्यात दिवसा उन्हाळ्यासारखी उष्णता आणि रात्री आणि पहाटे हिवाळ्यात थंडी जाणवत आहे.
मुंबईसह उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह उपनगरी भागात तापमानात किंचित बदल अपेक्षित असले तरी राज्यातील एकूण हवामानाची स्थितीत फारसा बदल नसेल . मुंबई शहरासह रत्नागिरीमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, वाढत्या तापमानामुळे राज्यातील काही भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे असूनही हवेतील थंडी कायम राहण्याची अपेक्षा आहे.
मराठवाड्यात पावसाची शक्यता !
राज्यात किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे .दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तरेत पश्चिम चक्रवात सक्रिय झाल्याने उत्तर मराठवाड्यात दिनांक 2 व 3 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे .दरम्यान उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असून काही भागात ढगाळ राहणार आहे .
राज्यात तापमानाचा पारा कसा ?
राज्यात 29 जानेवारी रोजी बहुतांश ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली होती .साधारण 14 ते 22 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाचा पारा गेला होता .तर कमाल तापमानातही वाढ झाल्याने नागरिकांना प्रचंड उघडण्याचा सामना करावा लागत आहे .राज्यात बहुतांश ठिकाणी 33 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाचे नोंद होत आहे .
अहमदनगर 15.5,औरंगाबाद 17.7,बीड 18.8,चंद्रपूर 20.4,धुळे 19,हिंगोली 19.7,जालना 18.4,लातूर 20.8,मुंबई कुलाबा 20.9,सांताक्रुज 19,नांदेड 19.6,नाशिक 18.5,धाराशिव 14.6,पालघर 19.2,पुणे 17.4-18,सोलापूर 17,वर्धा 18.8,यवतमाळ 20.2
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
