Temperature : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर; विजेच्या दरात वाढ
Temperature : विदर्भातील (Vidarbha) सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. काल (11 मे) अकोला आणि वर्ध्यात आज सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली
Temperature : सध्या राज्यातील तापमानात (Temperature) पुन्हा वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. या वाढत्या उष्णतेचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भातील (Vidarbha) सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. काल (11 मे) अकोला आणि वर्ध्यात आज सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या एक ते दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला असून, काही जिल्ह्यातील तापमान 45 अंशावर जाणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळं तापमान गाठलं होतं. मात्र, आता मे महिन्याच्या मध्यात सूर्य तळपायला लागला आहे. उत्तरेकडून उष्ण वारे विदर्भात येत आहेत. त्यामुळं तापमानात अचानक वाढ झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. विदर्भीयांना संपूर्ण मे महिना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये तापमानाने चाळीशीचा पार गाठला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळं वायेव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग वाढल्यानं तापमानात एकाएकी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं विदर्भासह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या या परिस्थिती सकाळपासूनच नागपूरकरांना कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे.
मालेगावला हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद, पारा 43.8 अंशांवर
नाशिकच्या मालेगाव शहरात सध्या सुर्यनारायणाचा प्रकोप जाणवत आहे. मालेगावातील तापमानाचा पारा या हंगामातील सर्वात उच्चांकी नोंदविला गेला आहे. शहरातील तापमान 43.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. वाढता उन्हाचा पारा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांमुळं रस्त्यांवर फिरणं मुश्कील झालंआहे. दुपारी प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने टोपी, उपरणे, गॉगल आदींचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे एकूण कामकाज आणि येथील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून शीतपेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
विजेच्या दरात वाढ
आधीच महागाई, अवकाळी पावसामुळं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच त्रस्त असलेल्या नागरिकांना आता वाढत्या वीज बिलाचा झटका बसला आहे. वाढत्या उन्हाने सर्वसामान्य माणूस होरपळत असतानाच वीज दर वाढीने पुन्हा एकदा झटका दिला आहे. 1 एप्रिल 2023 पासून विद्युत नियामक आयोगाने वीज दरात वाढ केली आहे. पहिल्या 100 युनिटपर्यंत एक रुपया पाच पैसे, तीनशे युनिटपर्यंत दोन रुपये तीस पैसे, पाचशे युनिटपर्यंत तीन रुपये, चोवीस पैसे प्रति युनिट अशी वाढ केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: