(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उकाडा वाढला! कोकणात उष्णतेची लाट, 5 ते 12 मे दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता
Maharashtra Heatwave Alert : ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापामानात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अनेत जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पार पोहोचलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ (Temperature Rise) झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसात उकाडा (Heatwave Alert) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रविवारी राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापामानात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अनेत जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पार पोहोचलं आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढ
आज अकोला आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमान वाढ पाहायला मिळत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामानाबाबत ताजी अपडेट दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत, काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. तसेच काही भागात गारपिटी होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, काही भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
5th May, IMD model guidance for cumulative rainfall for 5-7th May & 8-12th May 2024.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 5, 2024
Possibility of rainfall associated with #thunderstorms on east coast & parts of the southern peninsula.
Watch for IMD updates regularly. pic.twitter.com/INPzkOtkQL
या भागात पावसाचा यलो अलर्ट
सोमवारी विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 6 मे रोजी अकोला, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सोमवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
5th May, पुढील ४,५ दिवस विदर्भात व संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत, काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच गारपिटीचीही शक्यता आहे. Day 1, तापमान वाढण्याची शक्यता आहे.HW alert too. pic.twitter.com/DR7odYTTdT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 5, 2024
गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता
आयएमडीच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 5 ते 12 मे दरम्यान, महाराष्ट्रात अवकाळी पावसाची (Maharashtra Unseasonal Rain) शक्यता आहे. राज्याच्या विविध भागात आयएमडीने पावसाचा अंदाज (IMD Rain Prediction) व्यक्त केला आहे. पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांवर गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :