एक्स्प्लोर

Maharashtra Weather : आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा, तर काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज 

Maharashtra Weather : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस  (Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज (13 एप्रिल) राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील आज काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यरात्रीत मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं काही ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली आहे. तर काही ठिकामी घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत.

शेती पिकांना मोठा फटका

सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला मोठा फटका

गेल्या चार  ते पाच दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट सुरु आहे. यामुळं जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी अशा 11 तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलं आहे. या भागातील जवळ-जवळ 145 गावातील 8468 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले आहेत. आभाळचं फाटलं तिथं ठिगळं कुठं लावायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.  अवकाळी पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे 5814 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. डाळिंबाचे 773 हेक्टर, द्राक्षबागा 755 हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. इतर शेतीपिकं जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीमुळं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Mumbai Rain : मुंबईत वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Dharashiv Crime News: काका अन् आईच्या अनैतिक संबंधांची माहिती बापाला द्यायचा;13 वर्षीय पुतण्याला चुलत्यानं संपवलं, तुळजापूर हादरलं
काका अन् आईच्या अनैतिक संबंधांची माहिती बापाला द्यायचा;13 वर्षीय पुतण्याला चुलत्यानं संपवलं, तुळजापूर हादरलं
Ind vs Nz 1st ODI : प्रतीक्षा संपली! BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला मिळाला ग्रीन सिग्नल, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे खेळणार
प्रतीक्षा संपली! BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला मिळाला ग्रीन सिग्नल, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे खेळणार
Embed widget