एक्स्प्लोर

मुंबईसह कोकणात दमट वातावरण, तर 'या' भागात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? 

आजपासून पुढील तीन दिवस मुंबईसह (Mumbai) कोकणात ढगाळ वातावरणसह दमटयुक्त उष्णता राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मामिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली.

Maharashtra weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठ उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. अशातच महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) कधी दाखल होणार अशी चर्चा सुरु आहे. तर 8 ते 10 जुनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील तीन दिवस मुंबईसह (Mumbai) कोकणात ढगाळ वातावरणसह दमटयुक्त उष्णता राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मामिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. तसेच राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडण्याचा अंदाजही त्यांनी वर्तला आहे.

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीमुसार, 3 जूनपासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली या 9  जिल्ह्यात फक्त पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील उर्वरित 27 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. मुंबईसह कोकणात मात्र ढगाळ वातावरणसह पुढील तीन दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येणार असल्याचे खुळे म्हणाले.

चार ते पाच दिवसात मान्सून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता

येत्या चार ते पाच दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे मामिकराव खुळे म्हणाले. पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीनेही होवु शकते असे वाटते. 'रेमल ' चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर 30 मे ला पोहोचला असला तरी, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत 10 जून दरम्यानच पोहोचण्याची शक्यता जाणवते.

थोड्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणीचं धाडस करु नये

सध्याची एकंदरीत वातावरणीय स्थिती पाहता, पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरीप पेर तयारीसाठी शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण 20 जून दरम्यान पर्यंतही कदाचितवाट पहावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते. पेरणी तर होणारच आहे, पण सध्याच्या या वातावरणीय पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अति आत्मविश्वासावर, उगाचच धूळ-पेरणी वा बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करु नये, असा सल्ला माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळं चांगला पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करणं गरजेचं असल्याचे खुळे म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

मान्सूनचे केरळमध्ये आगमन, पण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? पंजाबराव डखांचा हवामानाचा अंदाज काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget