नऊ वर्षे आयुष्य अंधारात गेलं; कोरोना लसीमुळे सत्तरीच्या उंबरठ्यावर मिळाली गेलेली 'दृष्टी'
वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवाई या 70 वर्षाच्या वर्षाच्या आजीचं आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होते.

वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहे त्यामुळे सरकारकडून दिली जाणाऱ्या लसीकरण केंद्राकडे अनेकांनी पाठ फिरवली. मात्र काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांना सकारात्मक आणि चमत्कारिक परिणाम ही दिसायला लागले आहेत. वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी भागातील एका आजींची गेल्या 9 वर्षापासून गेलेली दृष्टी चक्क लस घेतल्यानंतर आली आहे.
वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवाई या 70 वर्षाच्या वर्षाच्या आजीचं आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होते. कारण दहा वर्षापूर्वी मोतीबिंदूमुळे बुबुळ पांढरी झाली आणि दोन्ही डोळ्यांनी दिसणे बंद झाले . मथुराबाई या मुळच्या जालना जिल्ह्यातील परतूरच्या मात्र त्यांना 9 वर्षा अगोदर अंधत्व आलं आणि त्यांच्या जीवन कायमच अंधारमय झालं. घरी मुलबाळ पती नसलेल्या त्यांच्या नातेवाईकाने आधार देण्यासाठी रिसोड येथे आणले. या दरम्यान या आजीने 26 जूनला रिसोड येथील समता फाउंडेशनकडून सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड या लसचा पहिला डोस घेतला आणि या आजीला आता दोन्ही डोळ्यांनी दिसायला लागलं. या आजीला गेली 9 वर्षा पासून दिसत नव्हते आता त्यांना लस घेतल्यामुळे अचानक स्पष्ट दिसायला लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लसीकरणाची भीती घालवत लसीकरण करण्यासाठी समता फाऊंडेशन समोर आले. गावात घराघरात आणि अपंग अंध व्यक्तींना घरी जाऊन लसीकरण केले. लसीकरणच महत्त्व पटवून दिले आणि मथुराबाईने लस घेतल्यानंतर डोळ्याने दिसू लागल्याने या आजीने मनापासून मुंबईच्या समता फाऊंडेशनचे आभार मानले आहे. मुंबई येथील समता फाउंडेशनचे संचालक पुरुषोत्तम अग्रवाल यांचे आभार मानले. शेजाऱ्यांच्या मते काही दिवसा अगोदर अंध असलेल्या मथुराबाई आज चालायला फिरायला आणि पहावयास लागल्याने हा चमत्कार आहे.
मात्र या मोहिमेत शामिल असलेल्या डॉक्टर अजय पाटील यांच्या मते डोळ्याच्या बाजूला असलेल्या सुजेने अंधत्व आले असावे. लसीकरणामुळे शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याने कदाचित सूज कमी होऊन दिसू लागले असावे. मात्र हा लसीकरणचा चमत्कार म्हणवा लागेल. मात्र या बद्दल अधिकृत डोळ्याचे तज्ञ चांगल्या प्रकारे सांगू शकतात असे डॉक्टर म्हणाले.
राज्यात लसीकरण बद्दल अनेकांचे गैरसमज असल्याने पाहिजे तसे लसीकरण होताना दिसत नाही. सरकारकडून या बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील केली जात आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्या वातावरणात 70 वर्षीय मथुरा बाईंची गेलेली दृष्टी परत आल्याने लस पूर्णपणे सुरक्षी आहे आणि ती घ्यायला हरकत नाही.
























