Maharashtra winter Session: विधिमंडळात प्रवेशापूर्वी आजपासून रोज कोरोना टेस्ट : आदित्य ठाकरे
Maharashtra Vidhimandal Assembly Session : अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केला असून आतापर्यंत एक मंत्री आणि एका आमदारासह 35 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
Maharashtra Vidhimandal Assembly Session : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीची सबब देत अधिवेशनाला गैरहजर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित न राहिल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तसेच विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून एक मंत्री आणि एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विधीमंडळ आवारात प्रवेशापूर्वी आजपासून डेली टेस्ट करावी लागणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून दोनच दिवसांत 35 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात बोलताना आदित्य पवार म्हणाले की, "गर्दी वाढली आहे. ख्रिसमस न्यू-ईयर असताना लोक काळजी जास्त घेत नाहीत. प्रत्येकानं मास्क लावणं गरजेचं आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावं लागणार आहे. वातावरण भीतीचं आहे. शाळा कॉलेज संदर्भातील निर्णय पुढील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळांसंदर्भात हा आठवडा झाल्यावर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, सध्या आम्ही पस्थिती पाहतोय." तसेच पुढे बोलताना विधिमंडळ परिसरात प्रवेश करताना आजपासून डेली टेस्ट करावी लागणार आहे, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत बोलताना पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्रीच नाही तर सर्वांनी काळजी घ्यावी लागेल. कोविड परिस्थिती पाहून मुख्यमंत्री विधानभवनात येणार की, नाही हा निर्णय घेतील." तसेच प्रत्येकाच्या मनात कोविड होऊन गेला, लस घेतली आहे, त्यामुळे होणार नाही असा गैरसमज आहे. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही मास्क घालवाच लागणार आहे. तसेच ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नाही, त्यांनी लस घेणं आणि मास्क लावण गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक
राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, वेगानं वाढणारे कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांच्याही नावाचा समावेश आहे. गेल्या 2 दिवसांत एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 2 दिवसांत 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण
- नितेश राणेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन विधानसभेत जोरदार गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह