Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची मागणी

Maharashtra Vidhimandal Adhiveshan Breaking News Live Updates: आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा... 

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 27 Jun 2024 01:35 PM
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meet: दरेकरांना पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meet:  राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो हो... लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं.

Uddhav Thackeray: लोढांच्या टाॅवरमध्ये ५० टक्के मराठी बांधवांना आरक्षण द्यायला हवे- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यांना घर मिळालीच पाहिजेत, आम्ही यासाठी पू्र्वीपासून आग्रही होतो. आता जे सरकारमध्ये मंत्री आहेत ते विकासक आहेत. लोढांच्या टाॅवरमध्ये ५० टक्के मराठी बांधवांना आरक्षण द्यायला हवे. त्यांनी त्यांचा टाॅवरमध्ये घेऊन दाखवावं, बसतात ना महापालिकेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Uddhav Thackeray: व्हॉट्सअॅप इंडस्ट्री कोणाची?; ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray: उद्या घोषणा करण्याआधी मागे केलेल्या घोषणांची अंमलबजावणी किती झाली याबाबत श्वेतपत्रिक काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. NEET प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप इंडस्ट्री कोणाची आहे?, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.  

Uddhav Thackeray: लिफ्टला  कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठक तिथेच करु- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: माझा आणि देवेंद्र फडणवीसांचा लिफ्टने प्रवास हा योगायोग होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच लिफ्टला  कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठक तिथेच करु, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील उद्धव ठाकरेंनी दिली.  

Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray: लाडक्या बहिण योजनेचं स्वागत करतो, मात्र लाडक्या भावालाही मदत करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना आणत आहे. मात्र मुलं मुली भेदभाव करू नका, लाडक्या भाऊंना पण मदत करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पोलीस भरतीत तरुणाना राहण्यास व्यवस्था नाही सोई सुविधा नाही. डब्बल इंजिन सरकारने आतापर्यंत अनेक वाफा सोडल्या आहेत.

Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray: दररोज ९ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. १० हजार २२ कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांना पिक विमा दिली जात नाही. ३ महिने निवडणूकीला आहे, तात्काळ शेतकऱ्यांची कर्ज माफी करा. नुसत्या घोषणा करू नका त्याची अंमलबजावणी करा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 


 

Uddhav Thackeray: खोके सरकार, राम मंदीरला गळती..; उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: हे खोके सरकार आहे. राम मंदीराला गळती झाली. पेपर गळती झाली आहे. राज्यातील शेतकरी खूप काही भोगत आहे. अमरावतीमध्ये रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय. घटनाबाह्य सरकार आलं तेव्हा घटनाबाह्या मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र सध्याचे मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने आमवस्या पौर्णिमेला शेतीला जातात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांचा एकत्र लिफ्टने प्रवास

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis: विधानसभेत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी लिफ्टने एकत्र प्रवास केला. यावेळी दोघांमध्ये दिवसभरातील कामकाजावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Chandrakant Patil And uddhav Thackeray Meet: उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटील यांची भेट

Chandrakant Patil And uddhav Thackeray Meet: उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही भेट झाली. अंबादास दानवे आणि अनिल परब त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी तिथेही खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. 

Naresh Mhaske on Future CM : महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा : नरेश म्हस्के

Naresh Mhaske on Future CM : महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा, 
तसाही त्यांनी निवडणुकीत झेंड्याचा रंग बदललेला आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा घरात बसून केलेला कारभार आणि अडीच वर्ष पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे यांनी केलेला कारभार याच मूल्यमापन करावं लागेल, असं नरेश म्हस्के म्हणाले. 

नरेश म्हस्के म्हणाले की, आमच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे, आमचा (महायुतीचा) राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील. 

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज विधीमंडळात होणार बैठक


धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात होणार बैठक


चौंडी येथील उपोषणकर्त्यांसोबत सरकार करणार चर्चा


ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी बोलावली तातडीची बैठक


आज दुपारी अतुल सावेंच्या दालनात दुपारी २ वाजता बैठक


ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राहणार उपस्थित


धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींना चर्चेचे निमंत्रण

 पदवीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, राज्य सरकार अधिवेशनात निर्णय घेणार?

पदवीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत करण्याचा सरकार घेणार निर्णय. मंत्रीमंडळ बैठकीत यावर आज सखोल चर्चा


या संदर्भात प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश.  या अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता


आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा या अधिवेशनात घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता


Vidhansabha Adhiveshan 2024: पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नेत्यांबद्दल सभागृहाला माहिती. 

Vidhansabha Adhiveshan 2024: अधिवेशनापूर्वी अजित पवारांचं ट्विट

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाच्या ह्या अधिवेशनात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर वेगानं पुढे घेऊन जाणारे तसंच सर्व समाजघटकाच्या हिताचे सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील असा विश्वास देतो, असे ट्विट अजित पवार यांनी अधिवेशनापूर्वी केले.

Hingoli News: नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान

Hingoli News: भागवत धर्माची पताका साता समुद्रापार पोहचविणारे  संत नामदेव महाराज यांची पालखी आज पंढरपूर कडे रवाना झाली आहे नामदेव महाराजांचे मूळ गाव असलेल्या नरसी नामदेव येथून ही पालखी निघाली आसुन मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत पुढील 26 दिवसांचा पायी प्रवास करून ही वारी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त पोहचणार आहे या वारी दरम्यान 4 ठिकाणी भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन केलं जातं असून आज पहिला रिंगण सोहळा हिंगोलीत होणार आहे आढाव घेतला आहे. 


 

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली 

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली 


महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी बाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती 


4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत सुनावणीची पुढील तारीख


12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत


महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आल्या होत्या

Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी

Maharashtra Legislative Assembly Session LIVE: आज म्हणजेच, गुरुवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरु होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सूरू होत आहे. या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. 

Maharashtra Legislative Assembly Session: विधानसभा निवडकीच्या काळात गटबाजी कराल तर याद राखा; मालिकाअर्जुन खर्गेंचा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दम

Maharashtra Legislative Assembly Session: विधानसभा निवडकीच्या काळात गटबाजी कराल तर याद राखा, थेट कारवाईला समोर जावे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकाअर्जुन खर्गेंचा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दम


पक्षा अंतर्गत काय कुरघड्या चाललात हे आम्हाला माहित असतात, त्यामुळे  यापुढे नकोच, ते खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशारा खरगेंनी 25 जून च्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना दिला. 


नाना पाटोले, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात खर्गेंना यांना महाराष्ट्रातील काही गट भेटले होते . त्याचा पण उल्लेख बैठकीत करण्यात आला.

Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा प्लान रेडी, महायुतीला शह देणार?

Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: लोकसभेतील चांगल्या कामगिरीमुळे महाविकास आघाडीला एक नवी ऊर्जा मिळालीय. आणि याच ऊर्जेचा वापर विधानसभा निवडणुकीत करण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने केलाय. आणि त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रचाराचा धागा पकडलाय. संविधान बचाव या यशस्वी नाऱ्याचा पुढचा अंक म्हणून, महाविकास आघाडी महाराष्ट्राचा स्वाभिमानचा नारा कसा देणारेय.

Maharashtra News: पदवीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत करण्याचा निर्णय सरकार घेणार

Maharashtra News: पदवीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काल यावर सखोल चर्चा झालीय. या संदर्भात प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. पावसाळी अधिवेशनात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा या अधिवेशनात घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण 13 दिवस चालणार कामकाज

Maharashtra Vidhimandal Adhiveshan: राज्य विधीमंडळाचं आज पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावर सरकारला घेरणार, सरकारला कोंडीत  पकडण्यासाठी विरोधक सज्ज

पार्श्वभूमी

Maharashtra Vidhimandal Adhiveshan Breaking News Live Updates: आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा... 


1. आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण 13 दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर


2. महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं  शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत


3. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित


4. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार


5. विरोधकांनी प्रथेप्रमाणं चहापानावर बहिष्कार टाकला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला,  पाठ्यपुस्तकात खोटं बोल पण रेटून बोल हा विरोधकांचा पवित्रा, फडणवीसांची टीका

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.