एक्स्प्लोर
Advertisement
मनसेकडून 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरे, शेलार यांच्यांविरोधात उमेदवार नाही?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी काल (02 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी मनसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी काल (02 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी मनसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात मनसेकडून 27 उमेदवारांची नावे घोषित केली होती. आज मनसेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून मनसेने आतापर्यंत 72 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, मनसेने 72 उमेदवार घोषित केले असले तरी अद्याप वरळी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मनसे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, वांद्रे पश्चिम मतदार संघातूनदेखील मनसेने कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. वांद्रे पश्चिम हा भाजप नेते आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे. शेलार हे राज ठाकरे यांचे मित्र आहेत. त्यामुळे राज ठाकरे शेलार यांच्याविरोधात उमेदवार देणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसे उमेदवारांची यादी
1. मंदार हळवे - डोंबिवली
2. प्राची कुलकर्णी - धुळे,शहर
3. जमील देशपांडे - जळगाव, शहर
4. अंकलेश पाटील - अमळनेर
5. विजयानंद कुलकर्णी - जामनेर
6. अॅड. रवींद्र फाटे - अकोट
7. डॉ. विजयकुमार उल्लामाळे - रिसोड
8. डॉ. सुभाष राठोड - कारंजा
9. अभय गेडाम - पुसद
10. गंगाधर फुगारे - नांदेड, उत्तर
11. सचिन पाटील - परभणी
12. विठ्ठल जवादे - गंगाखेड
13. प्रकाश सोलंकी - परतूर
14. संतोष जाधव - वैजापूर
15. नागेश मुकादम - भिवंडी, पश्चिम
16. मनोज गुडवी - भिवंडी, पूर्व
17. महेश कदम - कोपरी-पाचपाखडी
18. निलेश बाणखेले - ऐरोली
19. किशोर राणे - अंधेरी, पश्चिम
20. सुमित भारस्कर चांदिवली
21. सतीश पवार - घाटकोपर, (पूर्व)
22. विजय रावराणे - अनुशक्तीनगर
23. केशव मुळे - मुंबादेवी
24. संजय गायकवाड - श्रीवर्धन
25. देवेंद्र गायकवाड - महाड
26. प्रकाश रेडकर - सावंतवाडी
27. भाऊसाहेब पगारे - श्रीरामपूर
28. वैभव काकडे - बीड
29. शिवकुमार नगराळे - औसा
30. डॉ. हनुमंत भोसले - मोहाळ
31. मधुकर जाधव - अक्कलकोट
32. मनीषा करचे - माळशिरस
33. गणेश कदम - गुहागर
34. मनोज बाव्वनगडे - उमरेड
35. महालिंग कठाडे - राजुरा
36. युवराज येडूरे - राधानगरी
37. सुमेत भंवर - अंबरनाथ
38. सुनील निभाड - डहाणू
39. दिनकर वाढान - बोईसर
40. संतोष नलावडे - शिवडी
41. जुईली शेंडे - विलेपार्ले
42. विनोद राठोड - किनवट
43. डॉ. अमर देशमुख - फुलंब्री
44. अॅड. रामराव वानखेडे - उमरेड
45. मुकुंद रोटे - जळगाव, ग्रामीण
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी... pic.twitter.com/yPUlMGFdhb
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement