एक्स्प्लोर

विधानसभेसाठी कर्जत जामखेडच का? रोहित पवारांचं उत्तर...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावल्यानंतर आता त्यांचे दुसरे नातू पार्थ पवारांच्या निवडणूक लढण्याबाबत चर्चा सुरु आहेत. रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावल्यानंतर आता त्यांचे दुसरे नातू पार्थ पवारांच्या निवडणूक लढण्याबाबत चर्चा सुरु आहेत. रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणा आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्जदेखील केला आहे. निवडणूक लढवण्यासाठी याच मतदारसंघाची निवड का केली? याबाबत रोहित पवारांनी खुलासा केला आहे. रोहित पवारांनी याबाबत माहिती देण्यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये रोहित यांनी म्हटलं आहे की, या मतदारसंघात काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी आहे. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. कर्जत जामखेड मधील तरुणांशी, महिलांशी, विद्यार्थ्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या निमित्ताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसोबत असणारा हा संपर्क सामाजिक कामांमुळे अजून दृढ होत गेला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केलीच, परंतु जेव्हा कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली, तेव्हा लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा मनापासून आनंद, अभिमान वाटला. लोकांच्या मागणीनंतरच पक्षाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्हिडीओ पाहा रोहित पवार यांनी म्हटले की, वयाच्या 21 व्या वर्षी मी व्यावसायिक क्षेत्रात आलो. तेव्हा लोकांनी प्रश्न विचारले हे वय तर जग फिरायचे असते, इतक्या लवकर जबाबदारी का? तेव्हा माझं उत्तर होतं ते म्हणजे मला काम करायचं आहे. माझे आजोबा अप्पासाहेब पवार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करुन शेती, सहकार, पाणी, शिक्षण अशा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले होते. नगर जिल्ह्यात जेव्हा मी फिरत असतो तेव्हा आजही त्यांचे आणि त्यांनी केलेल्या कामांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या पश्चात वडिल राजेंद्रदादा आणि आई सुनंदा पवार हे ही जबाबदारी प्रसिद्धीपासून दूर राहत जमिनीवर पाय ठेवून पार पाडत होते. त्याच विश्वासाने व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. आज माझ्या व्यावसायिक क्षेत्राकडे पाहिले तर मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो, ती म्हणजे या विश्वासाला आणि प्रामाणिकपणाला तडा जाईल अस काम माझ्याकडून झालेलं नाही आणि होणारदेखील नाही. शेतकऱ्यांना भेटून प्रश्न जाणून घेण्याच प्रयत्न : रोहित पवार | बारामती | ABP Majha जिल्हा परिषद सदस्य म्हणून अर्ज दाखल करत असताना लोकांनी विचारलं व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी असताना, घराण्याचा मोठ्ठा राजकीय वारसा असताना जिल्हा परिषदच का? तेव्हा माझं उत्तर होतं मोठ्या कुटुंबात जन्म घेणं ही नशिबाची आणि अभिमानाची गोष्ट असू शकते. आदरणीय पवार साहेबांच्या राजकारणाचा वारसा आहेच त्याहून ती मोठ्ठी 'जबाबदारी' आहे. शुन्यातूनच गोष्टी समजावून घेवूनच स्वत:च कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तळागाळातील समस्यांना भिडलो. तळागाळातील समस्या समजून घेवून शिक्षण, आरोग्य, युवक, महिला, क्रिडा, बेरोजगारी अशा प्रत्येक ठिकाणी शक्य तितकं काम यशस्वीपणे करु शकलो. VIDEO | घराणेशाहीवर रोहित पवारांचं भाषण आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकिय क्षेत्र ज्या प्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, तसाच विश्वास ते टाकतील किंबहूना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकीय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget