एक्स्प्लोर

भुसावळला पायी जाणाऱ्या मजुरांना मालगाडीची धडक; 16 मजुरांचा मृत्यू, तर एक जण जखमी

महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला.

जालना : राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक मजूर देशभरातील अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक मजुरांनी पायी प्रवास करणं पसंत केलं आहे. अशातच कोरोनाच्या संकटात मजुरांशी संबंधित एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

सर्व मजूर जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले असून तिथून ते आपल्या गावी मध्यप्रदेशला जाणार होते. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी रात्री पायी प्रवास सुरु केला होता. रस्त्यात थकल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपून गेले. गाढ झोप लागल्यामुळे मालगाडी येत असल्याचं त्यांना समजलं नाही. अशातच जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना धडक दिली. एकूण 21 मजूर असून त्यातील 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

अपघाता मृत्यू झालेल्या मजुरांची यादी : 

1) धनसिंग गोंड रा, अंतवळी जी. सहडोल, मध्यप्रदेश. 2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. सहडोल, मध्यप्रदेश 3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. सहडोल, मध्यप्रदेश 4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया, मध्यप्रदेश 5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्यप्रदेश 6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्यप्रदेश 7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्यप्रदेश 8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्यप्रदेश 9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्यप्रदेश 10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्यप्रदेश 11) संतोष नापित, 12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल. 13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया. 14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश 15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया. 16) दिपक सिंग अशोक सिंग गौड रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश जखमी व्यक्ती : 1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे रा पोंडी ता जुनावणी जिल्हा मंडल खजेरी

पाहा व्हिडीओ :  मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू, तर 2 जण जखमी

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच राज्यांच्या सीमाही बंद असून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासही निर्बंध लावण्यात आले आहेत. विशेष अटींसह काही लोकांनाच देशांतर्गत प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येते. अशातच महाराष्ट्रात अडकलेले अनेक मजुरांनी पायीच आपल्या गावापर्यंत जाण्याचा मार्ग निवडला आहे. केंद्र शासनाच्या वतीने विविध राज्यांत अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक एक्सप्रेस ट्रेन्स सुरु केल्या आहेत. परंतु, असं असतानाही अनेक मजुरांचा पायी प्रवास मात्र सुरुच आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्याजवळ पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार पार पोहोचली आहे. तर मुंबईत आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 437 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 3301 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या : 

कोरोना रोखण्यासाठी आम्ही विनामोबदला दारू घरपोच करू; सांगलीतील संघटनेचा पुढाकार

परप्रांतियांना मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, प्रवासापूर्वीच होणार थर्मल स्क्रीनिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget