एक्स्प्लोर

कॅराव्हॅन, कॅम्परव्हॅन पर्यटकांच्या सेवेत! फाईव्ह स्टारची सुविधा देणारं चालतं-फिरतं हॉटेल आहे तरी कसं?

आलिशान कॅराव्हॅन, कॅम्परव्हॅन पर्यटकांच्या सेवेत, कॅराव्हॅनचं एका दिवसाचं भाडं 21 हजार रूपये प्रति दिवस असून यामध्ये तुम्हाला खाण्याकरता लागणारे काही ठराविक अन्नपदार्थ दिले जातात. तर, कॅम्परव्हॅन तुम्हाला स्वत:लाच ड्राईव्ह करावी लागते. याकरता 4 हजार रूपये प्रति दिवस इतकं भाडं आहे. यातून 3 ते चार जणांना प्रवास करता येतो.

रत्नागिरी : फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या अलिशान हॉटेलची आठवण झाली असेल नाही का? तर थोडं थांबा! तुम्ही थोडी घाई करताय. हे अलिशान हॉटेल नसून कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅन आहे. अगदी दोन शब्दात सांगायचं झालं तर चालतं - फिरतं हॉटेल! कॅराव्हॅन ही यापूर्वी केवळ युरोपीयन देशांमध्येच होती. पण, विद्यमान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घेतला. त्यानंतर ही व्हॅन पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे. 2018 मध्ये याबाबत पावलं उचलली गेली आणि 2020 मध्ये ही व्हॅन सध्या रस्त्यावर धावतेय. ही व्हॅन रस्त्यावर धावण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला आहे. याला Recreational Vehicle असं देखील म्हणतात. कॅरव्हॅन म्हणजे काय? सुविधा काय असणार? कॅरव्हॅन म्हणजे चालतं-फिरतं  हॉटेल.या व्हॅनमध्ये पर्यटन निवास तसेच एखाद्या हॉटेलमध्ये  मिळणाऱ्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत. सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ही व्हॅन आहे. युरोपीय देशांमध्ये शहरात बंगले असणाऱ्यांनी किंवा डोंगराळ, दुर्गम भागातील रहिवाशांनी आपल्या जागेत कॅराव्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाकघर, टीव्ही, इलेक्ट्रीसीटी, फ्रीज, टॉयलेट, बेड्स अशा सुविधा उपलब्ध आहेत. सध्या दोनच व्हॅन रस्त्यावर धावत असून 12 मीटर लांबीची कॅराव्हॅन तर छोटी कारच्या आकाराची कॅम्परव्हॅन आहे. कॅराव्हॅन तयार करण्यासाठी दोन वर्षे आणि अडीच कोटींचा खर्च आला. महत्त्वाची बाब म्हणजे ही व्हॅन एका मराठी माणसानं तयार केली आहे. त्याचं नाव सचिन पांचाळ असं असून त्याचं मुळगाव कोकणातील कणकवली तालुक्यामध्ये आहे. कॅराव्हॅन, कॅम्परव्हॅन पर्यटकांच्या सेवेत! फाईव्ह स्टारची सुविधा देणारं चालतं-फिरतं हॉटेल आहे तरी कसं? कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनमध्ये फरक काय? कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनमध्ये फरक देखील आहे बरं का? कॅराव्हॅन ही 12 मीटर लांब इतकी असून त्यामध्ये तुम्हाला अगदी किचनपासून  टॉयलेटपर्यतच्या सुविधा आहेत. पण  कॅम्परव्हॅन ही कारएवढी असून त्यामध्ये तुम्हाला टॉयलेट, बाथरूमची सोय नाही आहे. कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनचं भाडं किती? कॅराव्हॅनचं एका दिवसाचं भाडं 21 हजार रूपये प्रति दिवस असून यामध्ये तुम्हाला खाण्याकरता लागणारे काही ठराविक अन्नपदार्थ दिले जातात. सोबत एक क्लिनर आणि ड्रायव्हर दिला जातो. यामधून सहा प्रवासी मस्त प्रवास करू शकतात. तर, कॅम्परव्हॅन तुम्हाला स्वत:लाच ड्राईव्ह करावी लागते. याकरता 4 हजार रूपये प्रति दिवस इतकं भाडं आहे. यातून 3 ते चार जणांना प्रवास करता येतो. कॅराव्हॅनंनं मुंबईहून सहा प्रवासी कोकणात आले, त्यांचा यावेळचा अनुभव देखील मस्त आहे. मोटो होम आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या 1 मोठी आणि 1 मिनी कॅराव्हॅन धावत आहे. पर्यटनाकरता कॅराव्हॅन उपलब्ध करून देणारं देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरता एमटीडीसीसोबत टायअप करण्यात आलं आहे. राज्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, थंड हवेची ठिकाणं आहेत. पैकी अनेक ठिकाणी हॉटेल किंवा निवासाची सोय कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अशा ठिकाणी कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासासहित इतर सर्व सोयीसुविधा MTDCकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  ही बाब डोळ्यासमोर ठेवून कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता हॉटेल किंवा राहण्याची सोय नसलेल्या ठिकाणी जाताना पर्यटकांना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला तर का या व्हॅननं प्रवास करत लक्झरीअस प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर, www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर जात नोंदणी करता येणार आहे. कॅराव्हॅन, कॅम्परव्हॅन पर्यटकांच्या सेवेत! फाईव्ह स्टारची सुविधा देणारं चालतं-फिरतं हॉटेल आहे तरी कसं?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget