एक्स्प्लोर

कडाका होणार कमी! पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज किमान तापमान किती? वाचा IMDचा अंदाज

राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाच्या पाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट होती.

Temperature today: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार पहायला मिळत आहे. तापमानातल्या तीव्र बदलांमुळे नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचं सावट आहे. राज्यात मागील चार दिवसांपासून वाढलेल्या गारठ्यानं नागरिक कुडकुडत आहेत. अनेक भागांत तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. पहाटेच्या वेळी दाट धुकं होतं. आजपासून राज्यात किमान तापमानात वाढ होणार असून 2-3 अंशांनी तापमान वाढणार आहे. दरम्यान, सकाळपासून कुठे काय तापमान नोंदवलं गेलं पाहूया.. (Maharashtra Weather)

पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा किती?

राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाच्या पाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट होती. आज शनिवारी पुण्यात 12 ते 16 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. नगर, नाशिकमध्ये 12-13 अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले.  बहुतांश मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात काहीशी वाढ झाली आहे.

कुठे किती तापमान?

कोल्हापूर
min - 17
max - 31

रत्नागिरी
min - 21
max - 33

पुणे -
min - 17
max - 31

मुंबई
min - 23 
max - 31

नाशिक
min -  16 
max - 31 

जळगाव -
min - 17 
max - 32

छ संभाजीनगर- 
min - 15
max - 30


नांदेड
min - 17
max - 32  

अमरावती-
min - 14
max - 30 

नागपूर
min - 16
max - 28

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे. विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय . प्रादेशिक हवामान केंद्रानुसार 10 जानेवारी व 11 जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे .(Unseasonal Rain)

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम चक्रवतामुळे वातावरणात बदल होत असून, दक्षिण-पूर्व इराण आणि आसपासच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातही कमी उंचीवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा समन्वय होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून सध्या वातावरणात असलेला गारठा काहीसा कमी होणार आहे. किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

हेही वाचा:

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, गारठा प्रचंड वाढला, IMDने तापमानाबाबत काय दिलाय इशारा?

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Government: जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget