एक्स्प्लोर

एसटी संप आज मिटण्याची शक्यता; आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं, सदाभाऊ खोतांची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता आहे. आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

ST Strike Workers : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिली आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजत आहे. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी 10 वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु असंही खोत यांनी म्हटलं आहे. तसंच शिष्टमंडळाशी चर्चा करुन सरकारसोबतच्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही खोत यांनी दिली आहे.  

पगारवाढीचा 'गिअर', संपाला 'ब्रेक'? विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटलं आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली आहे. 

बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सांगितलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही पडळकर यांनी सांगितलं आहे. तसेच, आम्ही पोटतिडकीनं आमची बाजू मांडली. राज्यातील निलंबित झालेला कर्मचारी आहे, तो आझाद मैदान येथे येणार आहे. आज सरकारनं विलनिकरण करणाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितलं. 

पाहा व्हिडीओ : आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं : सदाभाऊ खोत

कालच्या बैठकीनंतर काय म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब? 

जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. चर्चा सकारात्मक झाली असून या प्रश्नी आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल, तो राज्य सरकारला मान्य असेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह संपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतन वाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन, संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget