एक्स्प्लोर

ST Bus News : आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील महिला प्रवाशांसाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे

ST Bus News : राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashta Budget) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून (17 मार्च)  एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. 

ST Bus News : आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

ST Bus News : आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.

एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता. 

रेणापूरमध्ये एसटी वाहकाला झाली होती मारहाण

शासनाने घोषित केल्याप्रमाणे महिलांना तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी महिला एसटी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही ठिकाणी वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागली असल्याने एसटी कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका वाहकाला महिला प्रवाशाच्या नातेवाईकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्तबंबाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Exclusive : जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
Sanjay Raut : 'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
Sanjay Patil : माझं नशीब उलटसुलट करणारा जिल्ह्यात अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही; संजय पाटलांचा विश्वजित कदमांवर पलटवार
कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला; लीड कमी होईल, पण...! संजयकाका पाटील काय म्हणाले?
Ajit Pawar : पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi Interview : मुंबईत येताच ठाकरे-पवारांवर जहरी वार; Road Show मधून पीएम मोदी EXCLUSIVENarendra Modi vs Farmer in Nashik : मोदींच्या सभेत शेतकरी ओरडला, कांद्यावर बोला! पुढे काय झालं?Eknath Shinde Speech Kalyan : अग्निपथ अग्निपथ अग्निपथ... मोदींसमोर एकनाथ शिंदेंचा फिल्मी अंदाजPM Narendra Modi Mumbai Road Show : मोदींच्या एन्ट्रीला DJने वाजवलं.. मेरे भारत का बच्चा बच्चा...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Exclusive : जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
Sanjay Raut : 'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
Sanjay Patil : माझं नशीब उलटसुलट करणारा जिल्ह्यात अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही; संजय पाटलांचा विश्वजित कदमांवर पलटवार
कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला; लीड कमी होईल, पण...! संजयकाका पाटील काय म्हणाले?
Ajit Pawar : पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
Amit Shah on Arvind Kejriwal : 'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
Embed widget