(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitesh Rane : नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Nitesh Rane : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायलीयन कोठडी मिळाल्यानंतर सरकारी वकिलांनी चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती.
नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या मोबाईलवरून आमदार नितेश राणे यांचं आरोपींशी संभाषण झालं आहे. त्यामुळे समोरासमोर बसवून,चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला. सरकारी वकिलांच्या युक्तीवांदानंतर पोलिस कोठडीला नितेश राणेंच्या वकिलांनी विरोध केला. नितेश राणेंचे वकिल म्हणाले, आम्ही तपासात सहकार्य केले आहे.
आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयाला शरण आल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मात्र दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.
नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. नितेश राणे यांनी 10 दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालीन कोठडी सुनवण्यात आली.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane : अखेर नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयासमोर शरण
- पालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
- Anil Deshmukh : ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब
- Praveen Raut Arrested : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई