Sanjay Raut : 'मुका घ्या मुका' प्रकरणामध्ये शिवसैनिकांचा संबंध काय? त्यांना का अटक करता? राऊतांचा सवाल
शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शिवसैनिकांना अटक करणं हा पोलिस यंत्रणेचा सत्तेचा गैरवापर असल्याचे मत शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
Sanjay Raut : मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना अटक का करता? याच्याशी शिवसैनिकांचा संबंध काय? असा सवाल शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शिवसैनिकांना अटक करणं हा पोलिस यंत्रणेचा सत्तेचा गैरवापर आहे. शिवसैनिक सुटू नयेत अशी कलम त्यांच्यावर लावली जात असल्याचे राऊत म्हणाले. आधी तो व्हिडीओ खरा की खोटा हे समोर येऊद्या असे राऊत म्हणाले.
तो व्हिडीओ संबंधीत आमदाराच्या मुलानं शेअर केलाय
शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शिवसैनिकांना अटक केल्यामुळं संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. मला आज असंख्य कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आज आमच्या कार्यालयात पोलिस येत आहेत. तो व्हिडीओ संबंधीत आमदाराच्या मुलानं शेअर केलाय सगळ्यांना, त्याला अटक केली का? असा सवाल राऊतांनी विचारला. ही तुमच्या गटातील अंतर्गत जर काही भांडणं असतील तर ती तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष्य करु नका असंही राऊत म्हणाले. तुम्ही मुके घ्या नाहीतर मिठ्या मारा पण तुम्ही आमच्या लोकांना अटक का करताय. आमच्या लोकांना धमकी का देताय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
देशाचे सरन्यायाधिश, देशाचं घटनापीठ आम्हाला न्याय देईल
निवडणूक आयोगानं एक विचित्र निर्णय दिला आहे. त्यानंतर असं वाटलं की या देशातील न्याय संपला. तरीही आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढाई लढत आहोत. आम्हाला आशेचा किरण दिसत आहे. या देशाचे सरन्यायाधिश, देशाचं घटनापीठ आम्हाला न्याय देईल असे राऊत म्हणाले.
विरोधी पक्षांचे सर्व खासदार करणार ईडीच्या कार्यालयावर मार्च
आज आम्ही विरोधी पक्षांचे सर्व खासदार ईडीच्या कार्यालयावर मार्च करत जाणार आहोत.या देशात सगळ्यात मोठा घोटाळा सुरुय तो अदानी कंपन्यांचा. तुम्ही त्यांना कधी बोलावणार. आम्ही आमची तक्रार घेऊन ईडी कार्यालयात जाणार आहोत. तक्रार दाखल करा हे सांगण्यासाठी ईडीच्या संचालकांनी भेटणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या:
Sheetal Mhatre Video: शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओमागचा खरा सूत्रधार वरुण सरदेसाई; शिवसेना शिंदे गटाचा आरोप