एक्स्प्लोर

Sanjay Raut : महाराष्ट्र सरकार कायद्याप्रमाणे वागतंय, त्याला कोणी अतिशहाणपणा शिकऊ नये; संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला

पोलिसांना एखाद्याची माहिती हवी असल्यास ती न देणं हे चुकीचं. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धोरण हे चुकीचं असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. 

मुंबई : काल केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पत्रकार परिषद पाहताना लक्षात आलं की पोलिसांना हव्या असलेल्या संशयिताची माहिती त्यांना आहे. महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये. महाराष्ट्र सरकार हे कायद्याप्रमाणे काम करत आहे. कायदा आपलं काम करत असून त्याला कोणीही अतिशहाणपणा शिकऊ नये असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, "पोलिसांना एखाद्याची माहिती हवी असल्यास ती न देणं हे चुकीचं. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धोरण हे चुकीचं. नोटीस कुणाला पाठवायचं हे कायदा विभागाचं काम आहे."

कायद्याला सहकार्य करणे हे सर्वांचे कर्त्यव्य आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्याला सहकार्य करावं असं खासदार संजय राऊत म्हणाले.

गुन्हेगार पाताळात जरी गेला तरी पोलीस शोधतील
गुन्हेगार पाताळात जरी लपला असाल तरी महाराष्ट्राचे पोलीस त्याला शोधतील असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करण्यात येत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कशा प्रकारचा त्रास होतोय हे माहिती आहे. केंद्र सरकारने अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींना तुरुंगात टाकलं.  हे आम्ही सहन करतोय असंही खासदार संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमदार नितेश राणे यांच्याबाबतची माहिती देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.  नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. त्याबाबत नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारलं असता, नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असं म्हटलं होतं. त्यावरुनच आता कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवून नारायण राणे यांनी नितेश राणे यांची माहिती द्यावी असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Inflation : महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती
मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget