एक्स्प्लोर

Maharashtra Doctors Strike: नवीन वर्षाच्या सुरुवातीला आरोग्य सेवा कोलमडणार? राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

Maharashtra Doctors Strike:  महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर उद्यापासून (2 जानेवारी 2023) संपावर जाणार आहेत. निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि सरकारमध्ये मागण्यांबाबत शनिवारपर्यंत कोणतीही चर्चा न झाल्याने संघटना संपावर ठाम आहे.

Maharashtra Doctors Strike:  नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून (Maharashtra Resident Doctors Strike) संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन देखील चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर 'मार्ड' (Maharashtra Association Of Resident Doctors)  ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहे. तर, दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच मार्डने आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता मार्डचे डॉक्टर संपावर जाणार आहेत. मार्डने राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी संप करत असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय, काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील मागण्या जोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा अधिक ताण येत आहे. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मार्डच्या संपात राज्यातील डॉक्टर सहभागी होणार असल्याने अनेक जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. निवासी डॉक्टरांच्या संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला आहे. 

मुंबईतील केईएम, नायर, सायन, कूपर आणि जे. जे. रुग्णालयाला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेच्या सूचना देण्यात आली आहे. 

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

मार्डने वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था झाली असून निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरण्याची मागणी मार्डने केली आहे. त्याशिवाय महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तत्काळ लागू करा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याची मागणी मार्डने केली आहे. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget