एक्स्प्लोर

राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, जेएन1 व्हेरियंटचेही रुग्ण वाढले, ठाण्यात सर्वाधिक रुग्ण

Coronavirus Maharashtra : देशभरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे.

Coronavirus Maharashtra : देशभरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे.  त्यातच कोरोनाच्या जेएन 1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण आढळायला लागलेत. एकटा ठाण्यात पाच रुग्ण आढळलेत, त्याशिवाय पुण्यातही जेएन1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य विभाग आणि डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचे आव्हान केलेय. 

राज्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. राज्यात काल नव्याने 50 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सोबतच, जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. एकीकडे सणांचे दिवस असताना वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरते आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख कसा वाढला  

1 डिसेंबर रोजी 

कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 12 

11 डिसेंबर रोजी 

कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 22 वर 

२० डिसेंबर रोजी 

राज्यातली ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 45 वर 

24 डिसेंबर रोजी 
 
राज्यातली एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 153 वर जाऊन पोहोचली आहे

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसतं आहे. एका महिन्याआधी कोरोना संपूर्णपणे बाजूला होईल असं चित्र आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र, जेएन १ व्हेरीयंटचा शिरकाव देशात झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण दिसतंय. राज्यातल्या कोरोनाच्या आकडेवारीत मागील 10 दिवसात झपाट्याने वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा वाढलेल्या चाचण्या… एकूण सुरुवातीला जेएन 1 व्हेरीयंटचा शिरकाव केरळ, गोव्यासह राज्यात देखील झाल्याने चाचण्यांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सोबतच, श्वसनाचे विकार असलेल्यांचे सर्व्हेक्षण देखील केलं जात आहे. त्यामुळे राज्यातल्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा मागील दहाच दिवसात तिप्पट गेलाय. सोबतच, जेएन१ व्हेरीयंटच्या रुग्णसंख्या देखील वाढ झाली असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जेएन१ चा राज्यात वाढता प्रसार!

20 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णाची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 24 डिसेंबर रोजी 9 जेएन1 व्हेरीयंटच्या रुग्णांची राज्यात नोंद झाल्याचं सांगितलं. ठाणे पालिका हद्दीत - 5, पुणे पालिका हद्दी 2, तर पुणे ग्रामीण, अकोला पालिका हद्द आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालीय. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे हे सर्वच दहाही रुग्ण बरे झाल्याची माहिती आहे.  

हिवाळा आला आणि पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं. एकीकडे रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू खूप कमी आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी झालेलं मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा फायदा देखील होताना दिसतोय. मात्र, जेष्ठ नागरिक असतील किंवा इतर व्याधी असलेल्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोपAnjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानियाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget