मुंबई :  संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवर मतदान न केल्याचा आरोप केल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी शरद पवारांची भेट घेतली. राऊतांनी पराभवाचं खापर अपक्षांवर फोडलं असल्याचं देवेंद्र भुयारांनी पवारांच्या भेटीनंतर म्हटलंय. दरम्यान गैरसमज झाल्याने राऊतांनी आरोप केले असल्याचं शरद पवारांनी म्हटलं असल्याचंही भुयार यांनी सांगितलं. तसचं आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचही त्यांनी म्हटलंय. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर  मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचही त्यांनी सांगितलंय. 


देवेंद्र भुयार म्हणाले, जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.  मुख्यमंत्री यांची अडीच वर्ष भेट झाली नाही मात्र आता भेट घेणार आहे.  जर निधी द्यायचा नसेल तर मग मताला आम्हांला फोन करु  नका.  मी माझ्यासाठी मतदान मागत नाही. मी महाविकास आघाडी सोबत होतो आणि राहणार आहे.


 शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान न केलेल्यांची यादीच सांगितली. या यादीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील समावेश आहे. मात्र भुयार यांनी राऊतांचा आरोप फेटाळला आहे. राज्यसभेसंदर्भात जे काही झाल ते मी शरद पवार यांना बोलून दाखवलं. पराभवाचं खापर माझ्यावर फोडलं. संजय राऊत यांच्याशी बोलून याविषयी खुलासा करायला सांगणार आहे असे शरद पवार म्हणाल्याची माहिती भुयारांनी दिली.


काय म्हणाले संजय राऊत ?


संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं होतं की, आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या